Modi Ji Ki Beti Motion Poster : 'मोदी जी की बेटी' (Modi Ji Ki Beti) या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकतेच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात पित्तोबाश त्रिपाठी, अवनी मोदी आणि विक्रम कोच्चर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


'मोदी जी की बेटी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा एडी (Eddy Singh) सिंहने सांभाळली आहे. सध्या या सिनेमाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोशन पोस्टर आऊट करत सिनेमाची नवी रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. अद्याप या सिनेमाचं कथानक समोर आलेलं नाही. 


मोशन पोस्टरमध्ये बुर्खा घातलेली एक मुलगी दिसत असून तिच्या समोर विविध न्यूज चॅनलचे माईक दिसत आहेत. मुलीचं मत जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. 'मोदी जी की बेटी' या सिनेमाचे दिग्दर्शक एडी सिंह यांनी मोशन पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"न पाहिलेली... न ऐकलेली... ही घटना कशी घडली? या घटनेसंदर्भात जाणून घ्या मोदींच्या लेकीकडून". 


'मोदी जी की बेटी' या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहोत', 'मोदी जी की बेटी' सिनेमासाठी शुभेच्छा, अशा अनेक कमेंट्स एडीच्या फोटोवर चाहते करत आहेत. 






'मोदी जी की बेटी' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'मोदी जी की बेटी' हा सिनेमा आधी 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. हा सिनेमा आता 16 सप्टेंबरला प्रदर्शित होणार नसून 14 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं कथानक अवनी मोदीनं केलं असून सिनेमाची निर्मितीदेखील अवनीनेचं केली आहे. 


संबंधित बातम्या


Vikram Vedha Teaser Out: हृतिक रोशन-सैफ अली खानचा दमदार अभिनय, 'विक्रम वेधा'चा धमाकेदार टीझर रिलीज


Avatar : The Way Of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' सिनेमागृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज; लवकरच सिनेमा होणार रिलीज