OTT Release This Week : ओटीटीवर (OTT) प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज प्रदर्शित होत असतात. या आठवड्यातदेखील प्रेक्षकांना रोमान्स, अॅक्शन, थ्रिलर आणि अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना 'खुदा हाफिज 2' पासून 'हिट: द फर्स्ट' पर्यंत अनेक सिनेमे आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत.
खुदा हाफिज 2कधी होणार प्रदर्शित? 8 जुलैकुठे होणार प्रदर्शित? झी 5
'खुदा हाफिज 2' या सिनेमाने सिनेमागृहात चांगला गल्ला जमवला नाही. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे पाहावे लागेल. हा सिनेमा 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. विद्युत जामवालच्या या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे.
राष्ट्र कवच होमकधी होणार प्रदर्शित? 11 ऑगस्टकुठे होणार प्रदर्शित? झी 5
'राष्ट कवच होम' या सिनेमात आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. एक जुलैला हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता पुन्हा एकदा हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 11 ऑगस्टला हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
आय एम ग्रुट कधी होणार प्रदर्शित? 10 ऑगस्टकुठे होणार प्रदर्शित? डिज्नी प्लस हॉटस्टार
मार्वल स्टूडीओजची नवी सीरिज 'आय एम ग्रुट' 10 ऑगस्टपासून प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मार्वलच्या चाहत्यांना या सीरिजची उत्सुकता आहे.
इंडियन मॅचमेकिंग2कधी होणार प्रदर्शित? 12 ऑगस्टकुठे होणार प्रदर्शित? नेटफ्लिक्स
भारताचा बहुचर्चित 'इंडियन मॅचमेकिंग' या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांना 12 ऑगस्टपासून पाहायला मिळणार आहे. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहू लागले. दुसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का हे लवकरच कळणार आहे.
हिट: द फर्स्टकधी होणार प्रदर्शित? 15 ऑगस्टकुठे होणार प्रदर्शित? अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ
'हिट: द फर्स्ट' हा सिनेमा मागील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता हा सिनेमा 15 ऑगस्टपासून प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. राजकुमार आणि सान्यासह या सिनेमात जतिन गोस्वामी, अखिल अय्यर, मिलिंद गुणाजी, शिल्पा शुक्ला, दलीप ताहिल आणि संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत आहेत.