मुंबई : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी देशातील धोरणकर्त्या वर्गाला केलेले आवाहन विचार करण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्राचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या या मंचाच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन काल आवाज उठवला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरुन अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचींग), विरोधात मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकाराविरोधात साहित्यिकांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. देशाला वेठीस धरले जात आहे अशी टीका केली. फादर दिब्रिटो यांच्यासह संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, कवियित्री अनुराधा पाटील आदींनी देशातील सद्यपरिस्थितीवर टीका केली.

मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, पत्रकारांना पोलिसांची धक्काबुक्की


याअनुषंगाने मंत्री देशमुख म्हणाले की, भारतीय लोकशाहीची फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केलेली वैचारिक मांडणी म्हणजे आज देशातील राजकारणासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांना समजावून घेण्याची सोपी वाटच आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला स्पष्ट, परखड आणि कणखर विचार व्यक्त करण्याची फार मोठी परंपरा आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन या देशाच्या भल्याची सर्वसमावेशक भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा उंचावणाऱ्या त्यांच्या या भाषणाने सर्वच राज्यकर्त्यांना जबाबदारीचे भान दिले आहे. त्याची दखल देशपातळीवर घेतली जाईल, अशी आशा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची दखल घेऊन त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मी त्यांची भेट घेण्याचे ठरविले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांच्याच सोयीने ही भेट होईल, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.

संबंधित बातम्या  

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटोंच्या भाषणावर अरुणा ढेरे नाराज, साहित्यिकांवर दबाव नसल्याचं मत  


Special Report | सीएए, जोएनयू प्रकरणावर फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचं परखड मत | ABP Majha


Sahitya Sammelan अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो याच्या तब्येतीत बिघाड | ABP Majha


साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईत परतले


मराठी साहित्य संमेलन | एका हातात धर्मग्रंथ तर दुसऱ्या हातात संविधान हवं : फादर दिब्रिटो