उस्मानाबाद : प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो मुंबईला परतले आहेत. उस्मानाबादमध्ये 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सुरुवातीपासून त्यांना पाठीचा त्रास होत होता. अखेर त्यांना मुंबईतील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी आणण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरु आहेत.


अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना आधीपासून हा त्रास सुरु होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक डॉक्टरांनी देखील त्यांच्यावर उपचार केले होते. पण त्यांच्या वसईतील त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्याच्या सल्ल्यानुसार अध्यक्ष संमेलनाच्या पहिल्याचं दिवशी मुंबईत उपाचारासाठी दाखल झाले.

दरम्यान साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो उपस्थित राहणार का याबाबत साशंकता आहे. परंतू डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष उपस्थित राहू शकतात.

उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाची शुक्रवार 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी गुलाबी थंडीत ग्रंथदिंडीद्वारे मोठया उत्साहात सुरुवात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उस्मानाबाद येथे प्रसिद्ध कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ग्रंथदिंडीचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे कौतिकराव ठाले-पाटील, जिल्हा परिषदचे सीईओ संजय कोलते यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलामधून ग्रंथदिंडी व शोभा यात्रेस मोठया जल्लोषात प्रारंभ झाला. विविध वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले विद्यार्थी, सामाजिक संदेश देणारे देखावे, टाळ - मृदुंगाचा गजर, विद्यार्थ्यांसोबतच तरुण, नागरिक, देशभक्तिपर देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले.

Osmanabad | 93व्या साहित्य संमेलनाला सुरुवात; संत गोरोबाकाका यांच्या पर्णकुटीची प्रतिकृती उभारली | ABP Majha



साहित्य-रसिकांची जिंकली मने

ग्रंथदिंडी व शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात विविध देखावे, छत्रपती शिवाजी महाराज, संत गोरोबाकाका, संत गाडगेबाबा, बाल वारकरी, महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक, मुलींचे बॅण्डपथक आदी मोठया संख्येने सहभागी होते. पूर्ण शहरात या शोभायात्रेमुळे उत्साहाला उधान आले हेाते. प्रस्तुत करण्यात आलेल्या विविध देखाव्यांनी साहित्य-रसिकांची मने जिंकली. जवळपास तीन किलोमीटरचे अंतर पूर्ण करून ग्रंथदिंडीचे संमेलनास्थळी आगमन झाले.
साहित्य संमेलनातील 11 जानेवारी 2020 चे कार्यक्रम

मंडप-(१) शाहीर अमर शेख साहित्य मंच

प्रकट मुलाखत - प्रतिभा रानडे,
वेळ : सकाळी 9.30 ते 11.00

विषय : आजचे भरमसाठ कविता लेखन : बाळसं, की सूज ?
वेळ : सकाळी 11.00 ते 01.00

कथाकथन
वेळ : दुपारी 02.00 ते 4.30

विषय : संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले /वाढते आहे.
वेळ : सायंकाळी 5.00 ते  7.30

सांस्कृतिक कार्यक्रम : रंगदृष्टी पुणे निर्मित शहरी जाणिवांमध्ये प्रथमच, 'रंगदृष्टी' सादर करीत आहे, जाणिवांचा जिवंत गाव
वेळ : रात्री 8.30 वाजता.
मंडप-(2) : सेतु माधवराव पगड़ी साहित्य मंच

सांस्कृतिक कार्यक्रम
वेळ : सकाळी 9.30 ते 11.00

विषय : अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील जीवनजाणिवा
वेळ : सकाळी 11.00 ते 01.00

विषय : एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?
वेळ : दुपारी 02.00 ते 04.30

आमचे कवी : आमच्या कविता
वेळ : दुपारी 4.30 ते सायंकाळी 8.00

Sahitya Sammelan | साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशींनाही धमकीचे मेसेजेस | उस्मानाबाद | ABP Majha