नाशिक : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शेतकरी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवत संपात सहभाग घेतला आहे.


निफाड - चांदवड मार्गावर उगांवला शेतकऱ्यांनी बैलगाडीसह रस्त्यावर येत बंदमध्ये सहभाग नोंदविला.

https://twitter.com/abpmajhatv/status/871581729017835520

अंबासन फाट्यावर मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. महाराष्ट्र बंदची हाक देत शेतीपिकाला हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर करून शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा कुटील डाव रचला. शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच रस्त्यावर टायर टाकत पेटवून दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एसटी बसेस सुरू असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला.

धुळे- सुरत-नागपूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

शेतकऱ्यांनी मध्यरात्रीच महामार्गावर टायर जाळल्यानं सुरत- नागपूर महामार्गावरील लोणखेडी फाटा येथे वाहतूक विस्कळीत झाली. शेतकरी महामार्गावर एकत्रित आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली.

धुळे बाजार समितीत भाजीपाला विक्री सुरळीत

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी भाजीपाला विक्री सुरळीत सुरु झाला. नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजीपाला विक्री सुरळीत सुरू आहे.

आजच्या महाराष्ट्र बंदला भाजप वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्यावतीनं आज धुळे बंदची हाक देण्यात आली आहे.

एसटी चालक- वाहकांना  प्रशासनाकडून सूचना 
ज्याठिकाणी आंदोलन सुरू असेल त्याठिकाणा पासून काही अंतरावर बस थांबवावी, जेणेकरून एसटी बसचे नुकसान होणार नाही. परिस्थितीचं गांभीर्य पाहून तात्काळ पोलिसांना तसेच वरिष्ठांना माहिती द्यावी, अशा सूचना एसटी चालक-वाहकांना देण्यात आल्या आहेत.

मनमाड-चांदवड रस्ता रोखला

शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी चांदवड तालुक्यातील दुगाव येथे बंद पाळण्यात येऊन, शेतकरी रस्त्यावर उतरले. तसंच मनमाड-चांदवड रास्ता रोखून  रस्त्यावर दूध आणि कांदा फेकला.

https://twitter.com/abpmajhatv/status/871579874909081600

सायगावात कांदाफेक

येवला तालुक्यातील सायगाव येथील ग्रामस्थानी गेले चार दिवस विविध आंदोलन केलं. आज गावात बंद पाळण्यात येवून सरकारचा निषेध करत ग्रामस्थानी कांदा फेक आंदोलन केले.

भजन-कीर्तनाद्वारे रास्ता रोको

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड येथे शेतकऱ्यांनी महामार्गावर रिंगण करीत भजने म्हणत रास्ता रोको आंदोलन सुरु केले

धुळ्यातील बाजारापेठा बंद

धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर बाजार समितीत कडकडीत बंद, जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारदेखील बंद

संबंधित बातम्या

LIVE UPDATE : राज्यातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंद 

शेतकरी संपावर : पाचव्या दिवशीही शेतकऱ्यांचा संप सुरुच

शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र बंदची हाक, संपाचं नेतृत्त्व नव्या खांद्यावर