श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बांदीपुरामध्ये आज पहाटे 4 वाजता या दहशतवाद्यांनी सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला चढवला होता. हा हल्ला परतवून लावत चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर जवानांनी “भारत माता की जय”चा जयघोषही केला आहे.


आज सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आत्मघाती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर जवानांनी केलेल्या जयघोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान हा हल्ला आत्मघाती असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आणखी काही दहशतवादी या परिसरात लपल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसंच परिसरात सर्च ऑपरेशनही सुरु आहे. गेल्या काही दिवसात भारतीय सैन्यानं पाकच्या कारवायांना जशास तसं उत्तर देण्याचा चंगच बांधला आहे. नुकताच भारतीय सैन्यानं नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ जारी केला होता.

पाहा व्हिडिओ :