Farmers Protest :  शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, MSP वर कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी शंभू आणि जींद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरुच आहे. रात्री उशीरापर्यंत शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये बैठक पार पडली. मंत्र्यांनी ५ तास शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest Delhi) थोपवण्यासाठी केंद्र सरकारकडून बळाचा वापर करण्यात येत आहे. आंदोलनस्थळी पोलिसांनी अश्रू धूराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आडून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. 


देशाभरातून आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न 


 पंजाब-हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनी देशभरातून आंदोलन उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमा गाठल्या आहेत. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. 


न्यायालयाने काय म्हटले? 


शेतकरी दिल्लीत दाखल झाल्यानंतर अनेक रोड ब्लॉक झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर भाष्य करताना न्यायालयाने म्हटले की, पंजाब आणि हरियाणातील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारनेही काम करावे, आंदोलनामुळे कोणालाही त्रास व्हायला नको, असे निरिक्षण न्यायलायाने नोंदवले आहे. या प्रकरणावर आता 15 तारखेला सुनावणी होणार आहे. 


 सरकारचे अपयश आहे - असदुद्दीन ओवेसी


शेतकरी आंदोलनावर AIMIM चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही भाष्य केले आहे. हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे ओवेसी म्हणाले आहेत. त्यांनी किमान आधारभूत किंमतीसाठी कायदा करण्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली पाहिजे, असे ओवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले आहेत. 


मागण्या मान्य होणार नाहीत तोवर आंदोलन सुरच राहिल - सरवन सिंग पंढेर 


शेतकरी नेते (Farmer Protest Leader) आणि पंजाब किसान मजूर संघर्ष समितीचे महासचिव सरवन सिंग पंढेर (Sarvan singh pandher) म्हणाले, जवळपास 10,000 लोक शंभू सीमेवर आहेत. शेतकरी शांततेत आंदोलन करत आहेत. ड्रोनच्या आधारे आमच्या अश्रू धूराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, सरकार जोवर मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असे पंढेर यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Uddhav Thackeray : 'ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडावं'; उद्धव ठाकरेंनी डागली तोफ