Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या धुळे दौऱ्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. धुळ्याच्या कार्यक्रमासाठी जात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पावसाच्या वातावरणामुळे विमानाच्या तांत्रिक अडचणीमुळे जळगाव विमानतळावर उतरले आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उशिरा होण्याची शक्यता आहे. 


आज धुळे (Dhule) शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित राहणार आहेत. धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर अचानक पावसाचे सावट आल्याने हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला असून मुख्यमंत्र्याचे विमान जळगावला उतरविण्यात आले आहे. ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे धुळे विमानतळावरून सिग्नल न मिळाल्यामुळे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री अजित पवार यांना जळगाव विमानतळावर उतरावे लागले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुध्दा असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान धुळ्याहून जळगावला गेले. वातावरण खराब असल्यानं विमान जळगावला गेले. जळगाव विमानतळावर उतरून चारचाकीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते आहे.