Jayakumar Rawal Profile in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधी मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला आहे. यामध्ये 19 मंत्री भाजपकडून मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून 11 जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सात जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रीपदांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून तब्बल 19 चेहरे मंत्रीपदामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये मंत्रीपदामध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. 


अशातच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांना देखील आज आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रातून गिरीश महाजन आणि जयकुमार रावल यांची नावे निश्चित झाली होती. अखेर जयकुमार रावल यांच्या मंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. मात्र ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आणि दोंडाईच्या राजघराण्यात जन्माला आलेल्या जयकुमार रावल यांचा राजकीय प्रवास तेवढाच रंजक राहिला आहे.  


राजघराण्यात जन्म,  नगरसेवक ते सलग पाचव्यांदा आमदार


माजी मंत्री असलेले जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला म्हणून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. खानदेशातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दोंडाईचा रावल संस्थानात (राजघराण्यात) त्यांचा जन्म झाला. ते सलग पाचव्यांदा भाजपाकडून आमदार राहिले आहेत. त्यांनी दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 28 व्या वर्षी तत्कालीन मंत्री हेमंत देशमुख यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापिठात बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.  


2004, 2009,2014, 2019 आणि  2024 असे सलग पाचवेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी मिळवला आहे. तर 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबीनेटमंत्रीपदी जयकुमार रावल यांची निवड झाली. पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभळला. तर 2014 च्या निवडणूकीत पाचव्यांदा त्यांनी 96 लाख मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा महायुतीचे  सर्व 5 आमदार निवडून आणण्यात आ. रावल यांचा मोठा वाटा असल्याचेही बोलल्या जात आहे. त्यात आता जयकुमार रावल यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आहे.  


जयकुमार रावल यांच्या विजयाची पाचव्यांदा  विजयी सलामी 


2004 मध्ये तत्कालीन शहादा मतदारसंघातून जयकुमार रावल हे भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले होते. यानंतर प्रत्येक निवडणुकीत जयकुमार रावल यांना विजय मिळत गेला. 2009 मध्ये पुनर्रचनेत निर्माण झालेल्या शिंदखेडा मतदारसंघातून बाजी मारताना त्यांनी काँग्रेसचे शामकांत सनेर यांच्याविरुद्ध 50 हजार 699 चे मताधिक्य घेतले. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांचा रावल यांनी 42 हजार 158 मताधिक्य घेत पराभव केला. 2009 च्या तुलनेत मताधिक्य घटले असले, तरी 2019 मध्ये रावल यांनी पुन्हा बेडसे यांच्यावर 42 हजार 915 च्या मताधिक्यासह विजय मिळवला आहे. यानंतर यंदाच्या निवडणुकीत देखील जयकुमार रावल यांच्या विजयाची घोडदौड कायम राहिली.


हे ही वाचा