Dhule Tension : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर जवळील जैताणे गावामध्ये काल (17 जुलै) रात्री अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात वाद झाला. यातून झालेल्या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले असून या ठिकाणी सध्या तणावपूर्ण शांतता असून या घटनेतील संशयित मात्र पसार झाले आहेत.


धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूरपासून जवळ असलेल्या जैतानी गावात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दोन गटांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून यातील संशयित मात्र पसार झाले आहेत. या हाणामारीत मुनाफ गफ्फर मणियार याचा मृत्यू झाला असून दुसऱ्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. 


याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता ठेवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  


नातेवाईकांचा संताप, मृतदेह घेण्यास नकार
या घटनेमुळे निजामपूर शहरात एकच खळबळ उडाली. मुनाफ मणियार यांच्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह निजामपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवला. आरोपींना अटक केल्याशिवाय पुढील कार्यवाही करणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ही माहिती कळल्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील हे अतिरिक्त पोलीस पथकांसह निजामपूर गावात पोहोचले. त्यांनी नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला. 


Dhule : धुळ्यात दोन गटांमध्ये राडा, एकाचा मृत्यू झाल्यानं खळबळ; वादाचं नेमकं कारण अस्पष्ट