धुळे : धुळे जिल्ह्यात (Dhule) सलग दुसऱ्या वर्षी लम्पी संसर्गजन्य आजाराने (Lumpy skin Disease) धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यात तब्बल 52 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात 35 जनावरांचा मृत्यू (Death) झाला आहे. तसेच तब्बल 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली असून 896 जनावरे लम्पिच्या विळख्यातून बरे झाले आहेत. 


गेल्या वर्षभरापासून राज्यभरात लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy) जनावरांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या पशुधनाला मुकावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सातत्याने लसीकरण, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव सुरूच आहे. नाशिक (Nashik) विभागातील धुळे जिल्ह्यात लम्पीने धुमाकूळ घातला असून तब्बल 52 गावामध्ये लम्पीचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत असून त्यामुळे पशुपालक चिंतेत आहे. यावर पशुसंवर्धन विभागाकडून ठिकठिकाणी जनावरांचे लसीकरण (Vaccination) करण्यात येत असून आवश्यक ती जनजगृती पशुपालकांमध्ये करण्यात येत आहे. सध्या 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली असून 896 जनावरे लम्पिच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. 


गोवंशात आढळणाऱ्या लम्पी या आजाराने मागील वर्षी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आल्यानंतर ही साथ नियंत्रणात आली होती. मात्र यावर्षी पुन्हा लंपीने डोके वर काढले असून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात तब्बल 52 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली आहे, जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यातील आठवडे बाजारात गोवंशय जनावरे विक्रीसाठी आणण्यात येत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.


शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण


गेल्या वर्षी नियंत्रणात असलेल्या लम्पी या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. या वर्षी सद्यस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे बाधित जनावरांपासून संसर्ग होवून चांगली, सुदृढ जनावरांना बाधा होऊ नये किंवा एकत्रित सार्वजनिक ठिकणी आणू नयेत. बाधित जनावरांचे विलगीकरण करावे. या वर्षी प्राण्यांवर या आजाराचे सावट असल्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी हा सण आपल्या घरीच अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र लम्पी या आजाराने पशुधन दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Agriculture News : पावसाने दडी मारली, चाऱ्याच्या प्रश्न गंभीर अन् त्यात लम्पीने चिंता वाढवली; शेतकरी तिहेरी संकटात