धुळे : एकीकडे विघ्नहर्ता गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जात असताना दुसरीकडे धुळ्यात मात्र विजेच्या आवाजाने काही पोलीस कर्मचाऱ्यांना कानाचा त्रास सहन करावा लागला असून यामुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजामुळे 15  पोलिसांना कर्णदोष झाल्याची माहिती आहे. विसर्जन मिरवणुकीनंतर पोलीस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दाखल  करण्यात आली आहे. 


गेल्या काही दिवसांपूर्वी विघ्नहर्ता मिळाला याचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात राज्यात पार पडला.  दुसरीकडे गणेश विसर्जनानंतर डीजेवर लावण्यात आलेल्या लेझर शोमुळे अनेकांना डोळ्यांचा त्रास सुरू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता धुळ्यात गणेश विसर्जनासाठी बंदोबस्ताला असणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना कानाचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.  


डीजे चालकांवर कारवाई करण्याची शक्यता


गणेश विसर्जनावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असून यामुळे कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना डीजेच्या त्रासाला सामोरे जावे लागल्याने आता यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांना डीजेच्या आवाजामुळे त्रास झाल्याची कुठलीही माहिती आपल्याकडे आली नसून अशी घटना घडलेली असल्यास आपण त्याबाबत माहिती घेऊन संबंधित डीजे चालकांवर यापुढे कारवाई करणार असल्याचे, तसेच संबंधित डीजे मालकांना बोलावून त्याबाबत सक्त सूचना देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. 


तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या


गणेश विसर्जनानंतर अनेकांना कानांचा आणि डोळ्यांचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील आपल्याकडे डॉक्टर संजय देवरे यांनी दिली असून तानाजी आवाज मर्यादा ही ओलांडल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात.  यामुळे नागरिकांनी डीजे पासून शंभर फूट अंतरावर दूर राहावे तसेच प्रशासनाने देखील डीजे वर बंदी आणावी अशी मागणी कर्ण रोग तज्ञ डॉक्टर संजय देवरे यांनी यावेळी केली.


अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव मिरवणूक मोठ्या आनंदात पार पडली. आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी आनंदात विसर्जित केलं. यामध्ये ढोल ताशासह आता सध्या डीजेचा ट्रेंड पडला आहे.  याच्या  गजरात नाचत, थिरकत गणपती बाप्पा ला निरोप दिला गेला! पण, त्यामुळे अनेकांना असह्य वेदना सहन कराव्या लागत आहे. 


हे ही वाचा :


Pune News : धक्कादायक! मिरवणुकीतील लेझरमुळे पुण्यातील तरुण अंशत: अंध; लोखंड कापण्यासाठी वापरणारे लेझर गणपती मिरवणुकीत..