Dhule: बुलढाणा आगाराची (Buldhana Depot) बस बुधवारी (12 जुलै) सकाळी बुलढाण्यावरुन धुळ्याकडे (Dhule) निघाली होती. बुलढाणा येथून धुळ्याला जाणाऱ्या बसमध्ये धुळे आगाराचे बस चालक (Bus Driver) असलेले प्रभाकर बाजीराव पारधी हे जळगाव येथून बसले. त्यांना जळगाव (Jalgaon) ते धुळेदरम्यान (Dhule) असलेल्या मुकटी या गावी जायचं होतं. परंतु बसला मुकटी या गावचा थांबा नसल्याने मूळ चालकाने बस थांबवली नाही. मुकटी येथे बस न थांबवल्याच्या रागातून धुळे आगाराचे बस चालक प्रभाकर पारधी यांनी फोनवरुन गावकऱ्यांनी बसच्या काचा फोडण्याचं फर्मान केलं.
धुळे आगाराच्या बस चालकाने बुलढाणा आगाराच्या बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडण्याचे आदेश फोनवरुन गावकऱ्यांना दिले. त्यांनी फोनवरून गावातील पंधरा ते वीस तरुणांना फोन करून या बुलढाणा आगाराच्या बसवर दगडफेक करून या बसच्या काचा फोडा, असं सांगितलं. धुळे आगाराच्या बस चालकाचा हा प्रताप बस वाहकाने फोनमध्ये चित्रित केला.
धुळे आगाराच्या या पारधी नामक चालकाने बसमधूनच गावकऱ्यांना फोन केल्याचा व्हिडीओ बुलढाणा-धुळे (Buldhana-Dhule) बसच्या वाहकाने तयार केला आणि धुळे (Dhule) येथे पोहोचल्यावर बुलढाणा (Buldhana) आगाराच्या वाहकाने सदर चालकाची तक्रार देखील धुळे बस स्थानकात केली. चालकच स्वत: एसटीवर दगडफेक करून काचा फोडण्याचं फर्मान देत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्यामुळे बुलढाणा आगाराच्या बस चालक आणि वाहकात वाद निर्माण झाला.
एसटी बसच्या चालकानेच असे आदेश दिल्याने आश्चर्च व्यक्त होत आहे. सदर प्रभाकर बाजीराव पारधी या धुळे आगाराच्या बस चालकावर विभाग नियंत्रक विजय गीते यांनी तात्काळ आदेश देऊन बस चालकावर (Bus Driver) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सदर बस वाहकाने लेखी तक्रार आगारात दाखल केली आहे. मुकटी गावचा थांबा नसताना प्रवाशांना बसमध्ये घेण्यासाठी चालकाने तिथे बस थांबवायला सांगितली आणि बस थांबवली नाही, त्यावेळी गावकऱ्यांना फोन करुन बसवर दगड मारुन काचा फोडण्याचे आदेश बस चालकाने दिले. त्या थांब्याचे तिकीट नसल्याने बस थांबवली नसल्याचंही बस वाहकाने स्पष्ट केलं आणि सदर तक्रारीनंतर धुळे बस चालकाचं निलंबन (Suspend) करण्यात आलं.
हेही वाचा: