Continues below advertisement


धाराशिव : कुणबी पुरावे असतानाही जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेरावा घातला. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी सबंधित अधिकाऱ्याला फोनवरुन चांगलंच झापलं आणि पुरावे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले. या आधी दोनवेळा आदेश देऊनही काम होत नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतलं


मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज प्रताप सरनाईक यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या सांगितल्या. यावेळी प्रताप सरनाईक यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसमोरच जात वैधता समितीच्या अधिकाऱ्यांना फोन करुन जाब विचारला.


Dharashiv Maratha Reservation Protest : मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक


धाराशिव जिल्ह्यामध्ये कुणबी पुरावे असतानाही जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला.


यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं. या आधी पालकमंत्र्यांनी सांगून देखील अधिकारी ऐकत नसल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं.


पालकमंत्र्यांना अधिकाऱ्याला झापलं


मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी जात वैधता समितीच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. त्यावेळी त्यांनी जाब विचारला. या आधीही, दीड महिन्यापूर्वी याच संबंधित फोन केला होता. पण अजूनही समस्या सुटत नाही, प्रशासन काही कार्यवाही करत नसल्याने प्रताप सरनाईक चांगलेच भडकले.


या आधी दोन वेळा फोन केला होता. त्यावेळी मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. पण अजूनही समस्या का सुटत नाही? असा प्रश्न सरनाईक यांनी विचारला.


तुमच्यामुळे शासनाला आणि आम्हाला त्रास होत असेल तर हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्याकडे चार्ज असतानाही काही कार्यवाही का करत नाही? असा प्रश्न प्रताप सरनाईक यांनी विचारला. तातडीने या प्रकरणात लक्ष घाला आणि नियमानुसार कार्यवाही करा असा आदेश प्रताप सरनाईक यांनी दिला.



ही बातमी वाचा: