Osmanabad Crime News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, महिलेच्या घरात घुसून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या महिलेच्या मुलाने काही लोकांविरोधात पोलिसात तक्रार केली होती. त्यामुळे याचा राग आल्याने संबंधित महिलेला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ या गावातील ही संतापजनक घटना आहे. दरम्यान या प्रकरणी दोन लोकांच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना राजाभाऊ जाधव असे तक्रारदार महिलेचं नाव आहे. तर राजाभाऊ श्रीमंत जाधव आणि संजय श्रीमंत जाधव असे दोन्ही आरोपींचे नावं आहेत.
मुलाने तक्रार केल्यामुळे त्यांच्या आईला घरात घुसून जाळण्याचा प्रयत्न केल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथे 30 जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली आहे. याबाबत राजाभाऊ श्रीमंत जाधव व संजय श्रीमंत जाधव या आरोपींवर उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वंदना राजाभाऊ जाधव या महिलेच्या मुलाने गावातीलच काही लोकांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान याचा राजाभाऊ श्रीमंत जाधव आणि संजय श्रीमंत जाधव यांना राग आला होता. त्यामुळे त्यांनी 30 जुलै रोजी वंदना जाधव यांच्या घरात घुसले.
मध्यरात्री वंदना जाधव यांच्या घरात घुसल्यावर आरोपी राजाभाऊ याने तुझ्या मुलाने आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल काढून वंदना जाधव यांच्या अंगावर टाकले. तर आरोपी संजय जाधव याने काडीने पेटवून देऊन जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान दाखवत वंदना जाधव यांनी स्वतःला या हल्ल्यातून वाचवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच वंदना यांचा जीव वाचला.
पोलिसात गुन्हा दाखल...
दरम्यान, या प्रकाराबाबत वंदना जाधव यांनी उमरगा ठाण्यात तक्रार दिली असून, दोन्ही आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
थोडक्यात वाचला जीव....
वंदना जाधव घरात एकट्या असताना दोन्ही आरोपी मध्यरात्रीच्या सुमारात घरात आले. अचानक दोन जण घरात आल्याने वंदना जाधव प्रचंड घाबरल्या. दरम्यान, काही वेळातच एकाने सोबत आणलेलं पेट्रोल वंदना यांच्या अंगावर टाकले. तसेच दुसऱ्याने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी वंदना जाधव यांनी स्वतःला वाचत तिथून पळ काढला. त्यामुळे त्यांचा थोडक्यात जीव वाचला.
इतर महत्वाच्या बातम्या: