धाराशिव: राज्यात पावसाने हाहाकार (Dharashiv Rain Farmers) माजवला आहे, मराठवाड्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं आहे, शेतकऱ्यांची पिके, जनावरे, घर, संसार या पुराच्या पाण्यात वाहताना दिसत आहे. पावसाचा मोठा फटका बीड धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये (Dharashiv Rain Farmers) बसल्याचं चित्र आहे, अशातच धाराशिव जिल्हाभरात पुराचा हाहाकार (Dharashiv Rain Farmers) सुरू असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाण्यात दंग असल्याचं दिसून येत आहे. तुळजापुरात नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुळजापुरात मंदिर संस्थानकडून यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये त्यांचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. (istrict collector Keerthi pujar ias attending fuction dance on stage video goes viral)

Continues below advertisement


22 तारखेला घटस्थापना होती आणि त्याच दिवशी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या पावसामुळे सर्वत्र पुराचा हाहाकार पाहायला मिळाला. याच दरम्यान तुळजापूर मंदिरामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. दरम्यान पाऊस आणि पुरानंतर मंत्री हे धाराशिव दौऱ्यावर आले होते, पाहणी करत होते, त्यानंतर हे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर आढळून आले. मात्र, त्याच संध्याकाळी जो कार्यक्रम होता सांस्कृतिक महोत्सवाचा त्यामध्ये जिल्हाधिकारी कीर्ती पुजार त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या दोघी त्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिल्या, त्या दोघींनी कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावली नाही तर त्या कार्यक्रमात त्यांनी गाण्यांवर ठेका धरल्याचाही दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता या दोघींवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. एकीकडे जिल्ह्यात पुराचा हाहाकार आहे, जनता पुराच्या पाण्यात वेढलेली असताना अधिकारी मात्र नाचगाण्यात दंग आहेत, अशी टीका होताना दिसत आहे. अद्याप याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही, हा सांस्कृतिक कार्यक्रम पूर्वनियोजित होता अशी माहिती आहे. 


एकीकडे धाराशिवमध्ये शेत शिवारात पाणी आहे. संसार उघड्यावर पडले आहेत. पिक पुराच्या पाण्याखाली गेली आहेत, हे दृश्य डोळ्यात पाणी आणणार आहे. तर दुसरीकडे त्याचा विरोधाभास म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे का? अशी टीका होत आहे, जिल्ह्यात विदारकदृश्य असताना हे सर्व नाच गाण्याचे कार्यक्रम होत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उडते आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ कालपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओ वरती जिल्हाधिकारी काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ज्या रात्री धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला पूर आला त्या दिवशीच्या रात्री हा कार्यक्रम झाला या परिस्थितीचा अंदाज असताना देखील अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित राहून नाचतात हे पाहून नागरिकांचा संताप झाला आहे.