तुळजापूर, धाराशिव : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. आजच्या या बैठकीत मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण 46 हजार 453 कोटी 90 लाख खर्च करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं. तसंच मराठवाड्यात विकास कामे, योजनांसाठी 37 हजार 16 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी तुळजापूरसाठी राज्य सरकारकडून 1385 कोटींचा निधी देण्याची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेल्या तुळजा भवानी मंदिर परिसरासाठी विकासकामे करण्यात येणार आहेत.


राज्य सरकारने तरतूद केलेल्या 1385 कोटींच्या निधीतून तुळजापूरमध्ये अनेक विकास कामे करणे शक्य होणार आहे. प्रथम टप्यामध्ये श्री तुळजाभवानी मंदिर परिसराचा विस्तार करणे, विसंगत संरचना, बांधकामे काढून टाकण्याचे काम होऊ शकते. तुकोजी बुवा मठाची पुर्नबांधणी करणे, स्टेडियम पायऱ्या आणि संबंधित बांधकामे हटवणे.  


> मुख्य मंदिरातील संवर्धनासमवेत प्रवेशद्वार विस्तारीत करणे, विद्यमान सभा मंडपाची पुर्नरचना आणि पुर्नबांधणी 


> विसंगत संरचना/बांधकामे हटवून परिसर रुंदीकरण (बीडकर जीना, कार्यालयीन इमारती, शौचालय, पोलीस चौकी, पोलीस चौकीमागील बांधकामे, परिसरातील पायऱ्या इत्यादी)


> तुकोजीबुवा मठाचे पुर्नबांधणी आणि नुतनीकरण 


> स्टेडीयम पाय-या व संबंधीत बांधकामे हटवीणे 


> राजमाता जिजाऊ महाद्वार आणि राजे शहाजी महाद्वारमधील इमारत काढून भाविकांना कळस दर्शन घेण्यासाठी नवीन महाद्वार तयार करणे. शिखर दुरुस्ती आणि रंगकाम होऊ शकते.


> मंदिरातील मुख्य शिखर, यज्ञमंडप शिखराची आवश्यक दुरुस्ती करुन रंगकाम करणे 


> मुख्य गाभाऱ्यातील विद्यमान संगमरवरी आवरण काढून टाकणे  


> गाभारा परिसरातील भिंती चांदीच्या करुन त्यावर सोन्याचे आवरण देणे मंदिरातील बाहेर पडण्याचे आणि प्रवेश करण्याचे मार्गाचे बांधकाम (रॅम्प व सबवे) 


> दर्शनपूर्व क्षेत्रापासून दर्शन मंडपापर्यंत कव्हर केलेला रॅम्प व भुयारी मार्ग 


> प्रसाधनगृह, उपहारगृह, निगराणी कक्ष, हिरकणी कक्ष, वैद्यकीय कक्ष इत्यादी आपत्कालीन सुविधा रॅम्पवर उपलब्ध करुन देणे नवीन दर्शन हॉल बांधकाम करणे (घाटशीळ पार्किंग (बेसमेंट+तळमजला+तीन मजले) आणि भवानी तिर्थ) 


>> सोयीसुविधा युक्त इमारत 


- नियोजीत तळमजल्यावर सुरक्षा व्यवस्था, पिण्याची पाण्याची सुविधा, शौचालय, प्रथोमपचार, भोजन सुविधा, क्लॉक रूम, हिरकणी कक्ष, इत्यादी सुविधा तयार करणे 


 - कोजागिरी पौर्णिमे दरम्यान कळस दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरीता पहिला आणि दुस-या मजल्यावर व्यवस्था करणे 


- तिसरा मजल्यावर मंदिराची प्रशासकीय कार्यालय उभारणी करणे. दुकांनाचे एकसारखेपण जपण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करुन पथदिवे बसविणे 


>> रस्त्यांचे रुंदीकरण 


> शहरातील रस्त्यांचे रुंदीकरणाची कामे होऊ शकतात. 


> मंदिराकडे येणारे शहरातील रस्त्यांचे 30 मीटर रुंदीकरण करुन रस्ते विकसित करणे 


> रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना चार मीटरचा लॅम्प पोस्ट तयार करणे 



> प्रस्तावीत रस्त्यांचे रुंदीकरणासह दुकानांचे एकसारखेपणा जपणे. 


>> भाविक सुविधा केंद्र आराधवाडी पार्किंग आणि हुडको पार्किंग


> तळघर आणि पहिल्या मजल्यावर भक्तांच्या वाहन पार्किंगसाठी क्षेत्र आरक्षित असेल. हुडको येथील पार्किंगमध्ये 4500 वाहने प्रती चार तास आणि प्रती स्लॉट (27 हजार कार प्रती दिन ) तसेच आराधवाडी पार्किंगमध्ये 2300 वाहने प्रती चार तास व प्रती स्लॉट (13800 कार प्रती दिन) असे एकूण 40,800 इतक्या क्षमतेची वाहने दोन्ही ठिकाणी प्रती दिन पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. तळघर आणि पहिल्या मजल्यावर स्नॅक्स, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी व्यवस्था, शौचालय व्यवस्था असेल. 


>  स्नानासाठी व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्था इत्यादी सुविधा असतील. 


> ओपन टेरेसवर सौर पॅनेल बसवीणे 


> सुलभ दर्शनासाठी क्युआर कोड व्यवस्था