Loksabha Election : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. धाराशिव लोकसभेच्या (Dharashiv loksabha) जागेवरुन शिवसेनेच्या शिंदे गट आक्रमक झाला आहे. धारशिवची जागा ही पारंपारिक शिवसेनेची (Shivsena) आहे. त्यामळं कोणत्याही शिवसैनिकाला या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी बार्शीचे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकरांनी (Bhausaheb Andhalkar) केली आहे. शिवसेनेकडून धनाजी सावंत यांनी किंवा मला उमेदवारी द्यावी असेही आंधळकर म्हणाले. 


आंधळकर धाराशिवमधून लोकसभेसाठी इच्छूक 


शिवसेनेच्या शिंदे गटाचे बार्शीतील नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भट घेतली. याबाबत तर्क वितर्क लढवले जातायेत. मात्र, एबीपी माझाशी बोलताना आंधळकर म्हणाले की, ही राजकीय भेट नाही. मी आंबेडकरांकडे वेगळ्या कामासाठी आलो होतो अशी माहिती आंधळकरांनी दिली. दरम्यान, आंधळकर धाराशिवमधून लोकसभेसाठी इच्छूक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचही बोललं जात होतं. मात्र, आंधळकरांनी याबाबत नकार दिला. मी सच्चा शिवसैनिक असल्याचं त्यांनी सांगितलं. धारशिवची जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे असे आंधळकर म्हणाले.  


कोणत्याही परिस्थितीत धारशिवची जागा शिवसेनेलाच द्यावी 


दरम्यान, धाराशिवच्या जागेसंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबच देखील चर्चा केल्याची माहिती भाऊसाहेब आंधळकरांनी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत धारशिवची जागा शिवसेनेलाच द्यावी अशी मागणी आम्ही केल्याचे आंधळकर म्हणाले. त्यामुळं जर आम्हाला जागा मिळाली नाही तर आम्ही क्रांती करणारा निर्णय घेऊ अशा इशारा देखील आंधळकरांनी दिलाय.


धनाजी सावंतही इच्छुक


दरम्यान, धाराशिव लोकसभा मतदारसंघातून मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनाजी सावंत हे देखील इच्छुक आहेत. नुकतीच त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळं धाराशिव लोकसभा मतदारसंघातून अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध वाढताना दिसत आहे. 


अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील यांना तिकीट


धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून आमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीकडून हे तिकीट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटले आहे. त्यांच्याकडून भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या निवडणूक लढवत आहेत. मात्र, यावरुन शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. धाराशिवची जागा राष्ट्रवादीला नको शिवसेनेला द्या अशी मागणी करण्यात येत आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Eknath Shinde: लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज; शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर धडकले