संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनीही स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत. जय हिंद'. असं एका ट्वीटमध्ये तर दुसऱ्या ट्वीटमध्ये "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे", असं राऊतांनी म्हटलं आहे. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2019 08:01 PM (IST)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.
मुंबई : केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे, असे म्हणत राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रेप इन इंडिया या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्यावर राहुल गांधींनी आपण राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहोत. त्यामुळं माफी मागणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यावर ट्वीट करताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटलं आहे. हे ही वाचा - आम्ही नेहरू, गांधींना मानतो तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा रणजित सावरकर यांची टीका तर राहुल गांधी यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये गफलत आहे. त्यांची कुठलीच वक्तव्य हे फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र सत्तेच्या राजकारणासाठी कुणीही महापुरुषांवर चिखलफेक करू नये, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली आहे. शिवसेनेने नेहमीच सावरकरांचा सन्मान केलेला आहे. यापुढेही सावरकरांच्या विरोधात जे जे बोलतील त्यांच्या विरोधात शिवसेना नेहमीच लढत राहील, अशी प्रतिक्रियाही सावरकर यांनी दिली आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे". जय हिंद राहुल गांधी काय म्हणाले होते? काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला.