मुंबई : मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीची छेडछाड करणारे टवाळखोर हे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. तर या छेडछाड प्रकरणी काही जण अटकेत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दुर्दैवाने या संपूर्ण प्रकरणात काही विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असून त्यांनी हे अतिशय वाईट अशा प्रकरचे काम केलंय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काहींना अटक केली आहे. तर इतरांनाही अटक केली जाईल. पण अशाप्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
छेडछाड करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही!
जळगावच्या मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुठल्याही परिस्थितीत या दोषींना माफी देण्यात येता काम नये. आरोपींवर अतिशय कडक पद्धतीने कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणले. दरम्यान रायगडचे पालकमंत्री कोण असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले की, रायगडचा पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत. त्यामुळे काहीही काळजी करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणात अनिकेत भाई, पीयूष मोरे, सोम माळी, अनुज पाटील आणि किरण माळी या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अनिकेत भाई एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे.
विरोधकांचे म्हणणे खरं आहे- रामदास आठवले
रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणे ही अत्यंत अयोग्य बाब आहे. तक्रार दिल्यानंतर आरोपी पकडले जातील. मात्र विरोधकांचे म्हणणे खरे असले तरी याच्यात राजकारण करण्याची गरज नाही. अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. वासना कांड चुकीच्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे नवीन यंत्रणा करणे महत्त्वाचे असून पोलिसांनी ऍक्टिव्ह राहणे महत्त्वाचे आहे. कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मोडणारे असंख्य असल्याची खंत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
हे ही वाचा