Mumbai Crime: महाराष्ट्राच्या राजधानीत मुलगी नको म्हणून बापाने पाळण्यातच चार महिन्यांच्या मुलीचा गळा घोटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय .घाटकोपरमध्ये बापाने मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पाळण्यातच अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला पाळण्याची दोरी आवळून ठार केल्याची संतापजनक घटना घडली .या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली असून संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .(Father Killed Doughter) मृत बाळाची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्याचं लक्षात येताच नराधम बापाने पाळण्याच्या दोरीने निष्पाप 4 महिन्यांच्या मुलीचा गळा आवळून हत्या केली .घाटकोपरच्या कामराजनगर परिसरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . 

मुंबईत गुन्हेगारीने डोके काढले असून अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नात्यात होणारे लैंगिक छळ, मारहाणीच्या गुन्ह्यांसह, लहान मुलींना आमिष दाखवत अपहरण, सेक्स रॅकेटचे गुन्हे वाढले आहेत. दरम्यान, मुलगी झाल्याच्या तिरस्कारातून पोटच्या मुलीच्या नरडीला नख लावण्याचं लाजीरवाणं कृत्य झाल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. 

नक्की घडलं काय?

मुंबईतील घाटकोपरमधून संतापजनक घटना समोर आली आहे .मुलगी नको म्हणून नराधम बापाने अवघ्या चार महिन्यांच्या निष्पाप मुलीची पाळण्यातच गळा आवळून हत्या केली .घाटकोपरच्या कामराज नगर भागात संजय बाबू कोकरे या नराधम बापाला पंतनगर पोलिसांनी अटक केली . शनिवारी (1 मार्च) बाळाची आई काही वेळ कामानिमित्त घराबाहेर गेल्याचे लक्षात येताच संधीचा फायदा घेत संजय कोकरेने  पाळण्याच्या दोरीने आपल्या मुलीचा गळा घोटून तिला पाळण्यातच संपवले .काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर बाळ हालचाल करत नसल्याचं तिला लक्षात आलं .तिने आरडा ओरड केल्यानंतर हा प्रकार समोर आला . पोलिसांना ही बातमी कळताच घटनास्थळी धाव घेत पंतनगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली. एकीकडे बेटी बचाव च्या घोषणा देणाऱ्या समाजात मुंबईसारख्या राजधानीच्या ठिकाणी  मुलगी जन्मल्याच्या तिरस्कारातून  हत्या होते ही लाजिरवाणी बाब असल्याचं बोललं जातंय.

पुण्यात आई घराबाहेर गेल्यावर बाप मुलीवर करायचा जबरदस्ती

स्वारगेटमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने पुणे हादरलं आहे. पुण्यात पुन्हा लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता. आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आला आहे. 

हेही वाचा:

Pune Crime News: बापाकडून मुलीवर लैंगिक अत्याचार, आई घराबाहेर गेल्यावर बाप मुलीवर करायचा जबरदस्ती, घटनेने संताप