गोवा : पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर आरोप केले आहेत. "एवढ्या कमी वेळात 250 लोक कसे आले? नरेंद्र मोदींचा ताफा रोखणे हे ठरवून केलेले कृत्य आहे. अधिकारी मोदीजींना भेटायला गेले नाहीत, याचा अर्थ त्यांना ताफा अडवला जाणार हे माहिती होते" असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, "नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींवर काँग्रेस पक्षाच्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा यात सहभाग आहे हे स्पष्ट होत आहे. या घटनेला पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे का? पंतप्रधानांचा ताफा रोखला याची चोकशी झाली पाहिजे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत असलेले लप्स हे स्टेट स्पॉन्सर लप्स होते, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे. 


"यापूर्वी झालेल्या अशा घटना माहिती असूनही पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीवरून पंजाब सरकारच्या मनात काय होते हे कळते, असा आरोप करत काँग्रेस पक्ष वागत आहे ते लोकशाहीसाठी मारक असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.  


अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटीप्रकरणी पंजाब पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना त्यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पंजाबच्या चन्नी सरकारने स्थापन केलेल्या समितीवरही सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केलेत. तसेच पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हालचालींचे संपूर्ण रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिलेत.  


महत्वाच्या बातम्या