अहमदनगर : सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहनही केले तरी सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आगारात अजूनही कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय


अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण नऊ एसटी सुरू झाले असून जिल्ह्यात एकूण 3800 कर्मचारी आहेत, त्यापैकी 1200 कर्मचारी कामावर रुजू झालेत. या संपादरम्यान जिल्ह्यातील 290 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलंय. निलंबन करण्यात आलेल्यांपैकी 70 कर्मचारी कामावर हजर झालेत. तर, 27 कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आलीये. तरी सुद्धा अनेक कर्मचारी संपावर ठाम असून विलगीकरणाची मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार केल्याचं सांगितलं आहे.


दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात आज मितीला 120 फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी विभागाने दिली असली तरी या अतिशय कमी फेऱ्या असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. विशेष म्हणजे तारकपूर बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांचे कपडे घातलेला व्यक्ती खासगी वाहन घेऊन प्रवासी घेऊन जाताना दिसून आलाय...त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्ती केली आहे.


एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट सांगितले आहे की विलिनीकरण शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करु असे सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही असे जेष्ठ नेते खासदार शरद पवारांनी स्पष्ट केलं. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha