मुंबई: किनारी रस्ता प्रकल्पातील उत्तरवाहिनी मार्गिकेवरील वांद्रे-वरळी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाचा आज लोकार्पण सोहळा आज पार पडला. या पुलामुळे इंधन बचत होणार आहे आणि लवकर ब्रिज क्रॉस करता येणार आहे. शिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना या कामाचे भूमिपूजन झाले. नंतर मी मुख्यमंत्री असताना या विकासकामाला गती मिळाली. तर महायुती सरकारच्या काळात सुरू झालेलं काम आता तिसऱ्या टप्प्यात देवेंद्रजीच्या काळात पूर्ण झालं आहे.


आपण जर वरून हा प्रकल्प पाहिला तर आपण परदेशातील ब्रिज बघत आहे, असं लोकांना वाटतं. आता काही लोकांना वरळीत जास्त वेळ एंजॉय करता येईल. किंबहुना सरकार बदललं नसतं तर तुम्हाला आज काहीच दिसल नसतं. एमटीएनएल ब्रिज सुद्धा पहिला मिळाला नसता. असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी सागरी सेतुला जोडणाऱ्या पुलाबाबत भाष्य केलं आहे. 


पुढच्या काळात डबल इंजिन सरकार अधिक वेगाने धावेल


भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्तनिमित्ताने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा. तर स्वातंत्र्यवीरांमुळे स्वतंत्र मिळालं त्यांना विनम्र अभिवादन.महाराष्ट्र सरकारमुळे महाराष्ट्राचा गतिमान विकास होतोय. ते अधिक वेगाने पूढे होईल. राज्याच्या तमाम सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ, युवा आणि आम्ही अडीच वर्ष काम केलं त्यामुळे जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि कामाची पोचं पावती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज राज्याचा अधिकचा विकास होतोय. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली दाओसमध्ये 15 लाखं कोटीचे करारनामे झालेले आहेत. महाराष्ट्रासाठी ही भूषणाची बाब आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योजक येत आहेत. पुढच्या काळात डबल इंजिन सरकार अधिक वेगाने धावेल. असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी भारतीय प्रजासत्ताकाच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन केले तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या.


दावोस दौऱ्यात 15 लाख कोटींचे सामंजस्य करार


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,  देशाचा 76वा  प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपले राज्य आणि ठाणे जिल्हा देखील वेगाने प्रगती करत आहे. जिल्ह्यात अनेक बदल घडत असून रस्ते, रेल्वे आणि मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. कृषी, उद्योग, सेवा, रोजगार अशा सर्वच क्षेत्रात आपला ठाणे जिल्हा आघाडीवर आहे. नुकत्याच पार पडलेल्या दावोस दौऱ्यात 15 लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र सर्वांगीण प्रगती साधेल असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.


यावेळी पोलिसांनी दिलेली मानवंदना स्वीकारून प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेले संचलन पाहिले. तसेच या सोहळ्याला उपस्थित असलेले आजी-माजी पोलीस अधिकारी, पोलीस कुटूंबीय आणि शहीद पोलिसांच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांना आधार दिला. तसेच यावेळी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.


हे ही वाचा