नवी दिल्ली : कोरोना लसीच्या संशोधनाचं काम करणाऱ्या भारत बायोटेकने आज कोवॅक्सिनच्या (COVAXIN) तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची घोषणा केली आहे. तिसऱ्या टप्प्यात लसीचं ट्रायल जवळपास 26 हजार स्वयंसेवकांवर केलं जाणार आहे. भारतात कोविड 19 लसीच्या संशोधनासाठी आयोजित करण्यात येणारं सर्वात मोठं ह्युमन क्लिनिकल ट्रायल आहे. भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सोबतीने ही तयारी केली आहे.
चाचणीदरम्यान स्वयंसेवकांना अंदाजे 28 दिवसात दोन इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिले जातील. चाचणी डबल ब्लाईंड करण्यात आली आहे, जेणेकरुन संशोधक, सहभागी आणि कंपनीला हे माहिती होणार नाही की कोणत्या समुहाला नेमले आहे. यात स्वयंसेवकांना कोवॅक्सिन किंवा प्लेसबो देण्यात येणार आहे.
भारत बायोटेक याबाबत सांगितलं की, लसीच्या चाचण्यांचे पहिले व दुसरे चरण चांगलं होतं. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात सुमारे एक हजार स्वयंसेवकांना ही लस दिली गेली. चाचणी दरम्यान सुरक्षा आणि रोगप्रतिकार शक्ती आढळली. या चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्वयंसेवकांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ही मल्टीसेन्टर थर्ड फेस ट्रायल भारतातील 22 ठिकाणी होणार आहे.
ट्रायलचं आयोजन कुठे कुठे होणार?
- नवी दिल्ली - एम्स
- पटना - एम्स
- भुवनेश्वर - आयएमएस एसयूएम हॉस्पिटल
- नवी दिल्ली- गुरु तेज बहादूर रुग्णालय
- मुंबई - ग्रांट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल
- गुंटूर - गुंटूर मेडिकल कॉलेज
- भोपाळ- गांधी मेडिकल कॉलेज
- अहमदाबाद-जीएमईआरएस मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटल
- उत्तर प्रदेश - अलिगड मुस्लिम विद्यापीठ
- हैदराबाद - निझाम वैद्यकीय विज्ञान संस्था
- रोहतक- पंडित भागवत दयाल शर्मा आरोग्य विज्ञान विद्यापीठ
- गोवा - रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर
- गुवाहाटी - गुवाहाटी वैद्यकीय विज्ञान संस्था
- फरीदाबाद - ईएसआयसी हॉस्पिटल
- मुंबई - लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज (सायन हॉस्पिटल)
- नागपूर- राठे रुग्णालय
- पुडुचेरी - एमजी मेडिकल कॉलेज, श्री बालाजी विद्यापीठ
- बंगळुरू - वैदेही वैद्यकीय विज्ञान संस्था
- विजाग - किंग जॉर्ज हॉस्पिटल
- भोपाळ- पीपल्स युनिव्हर्सिटी
- कोलकाता - आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ कॉलरा अँड एंटरिक डिजीज
- चेन्नई - सार्वजनिक आरोग्य व प्रतिबंधात्मक औषध संचालनालय, टेनमपेट