जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले की त्यांचा 'सर्वोत्तम अंदाज' असे स्पष्ट करतो की जगाच्या एकुण लोकसंख्येपैकी 10 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली असेल. ही संख्या सध्याच्या पुष्टी झालेल्या एकूण कोरोना रुग्णांच्या 20 पटीने जास्त आहे.
डॉ. मायकल रायन हे जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यीय कार्यकारी मंडळासमोर कोरोनाच्या प्रादुर्भावासंबंधी बोलत होते. ते म्हणाले की, ही संख्या ग्रामीण आणि शहरी भागात तसेच वेगवेगळ्य़ा गटात वेगवेगळी आहे. याचा अर्थ असा होतोय की जगातील बहुसंख्य लोकसंख्या संकटात आहे. ते म्हणाले की कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच जाणार आहे पण त्याचा प्रसार रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी साधने उपलब्ध आहेत. आपण ती कशा पध्दतीने वापरतो यावर आता जगाचे भविष्य अवलंबून आहे.
आत्तापर्यंत बऱ्याच मृत्यूंना आळा घालण्यात यश मिळाले आहे आणि यापूढेही अनेकांचे प्राण वाचवले जातील असे रायन म्हणाले. त्य़ा आधी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी या आजाराला बळी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहिली तसेच अनेकांचे प्राण वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली.
रायन पुढे म्हणाले की दक्षिण पूर्व आशियात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, युरोप आणि पूर्व भूमध्य भागात कोरोनाच्या मृतांच्या संख्येत वाढ होत आहे तर आफ्रिका आणि पश्चिम प्रशांत महासागर भागात परिस्थिती सकारात्मक आहे.
आमचा सध्याचा सर्वात्तम अंदाज असे सांगतो की जगातील प्रत्येक दहा पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे., असे रायन यांनी कार्यकारी मंडळासमोर बोलताना सांगितले. कार्यकारी मंडळ हे जगातील अनेक देशांतील शासनांच्या प्रतिनिधींपासून बनले आहे. त्यांच्याद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला फंड उपलब्ध करून दिला जातो.
जगातील एकुण 7.6 अब्ज लोकसंख्येपैकी 760 दशलक्ष लोकांना लागण झाल्याचं हा अंदाज आहे जो जागतिक आरोग्य संघटना आणि जॉन हापकिन विद्यापीठाच्या 35 दशलक्ष या संख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. तज्ञांच्या मते, कोरोनाची लागण झालेल्या खऱ्या आकडेवारीपेक्षा सध्याची सांगण्यात येणारी आकडेवारी ही खूप लहान आहे.
गेल्या मे महिन्यात झालेल्या बैठकीचा आढावा घेताना आ्णि कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी डब्लूएचओची भूमिका काय आहे या विषयावरच्या चर्चेदरम्यान रायन यांनी हे मत व्यक्त केले. त्यावेळी ते असेही म्हणाले की जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. कोरोनाचे संक्रमण जगभर बऱ्याच भागात वाढताना दिसत आहे.