CRPF Munir Ahmed: भारतीय केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबल मुनीर अहमद (CRPF Munir Ahmed) यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी मुलीसोबत विवाह केला होता. मात्र याबाबत मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी महिलेसोबत विवाह केल्याची माहिती देखील लपवली होती. त्यामुळे मुनीर अहमद यांना बडतर्फ करण्यात आले आहे. औपचारिक मान्यता नसतानाही मुनीर अहमदने पाकिस्तानी मुलीसोबत विवाह केला. त्यांनी मुनीर अहमदविरुद्ध बडतर्फची कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

सीआरपीएफ जवान मुनीर अहमदचा अडीच महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नागरिक मीनल खानशी विवाह झाला होता. त्यानंतर ती व्हिजिटिंग व्हिसावर भारतात आली आणि नंतर तिने दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तिच्या व्हिसाची मुदत 22 मार्च 2025 रोजी संपली होती आणि तरीही ती भारतात राहत होती. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर मीनल खानची दीर्घकालीन व्हिसासाठी मुलाखत घेण्यात आली होती. ज्या दिवशी ती अटारी-वाघा सीमेवर होती त्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात तिच्या याचिकेवर सुनावणी पार पाडली. कोर्टाने अंतरिम आदेश दिल्यानंतर तिला सीमेवरून परत पाठवण्यात आले होते.

सीआरपीएफने काय म्हटलं?

पाकिस्तानी महिलेसोबतच्या लग्नाची वस्तुस्थिती लपवल्याबद्दल सीआरपीएफने जवान मुनीर अहमद यांना बडतर्फ केले आहे. मुनीरच्या कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानी नागरिकाशी लग्न लपवल्याबद्दल आणि व्हिसाच्या वैधतेपेक्षा जास्त काळ तिला जाणूनबुजून आश्रय दिल्याबद्दल तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची पुष्टी देखील सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी केली. 

मीनल खानशी लग्न करण्याची परवानगी नव्हती-

खरं तर, मुनीरने मीनलशी लग्न करण्याची परवानगीसाठी सीआरपीएफकडे अर्ज केला होता. त्याचा अर्ज स्वीकारण्यापूर्वी आणि सीआरपीएफ मुख्यालय कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच, मुनीरने पाकिस्तानी महिलेशी लग्न केले, त्यानंतर ती भारतात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आणि त्यांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले तेव्हा मीनलने जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्याने तिला 30 एप्रिल 2025 रोजी काही दिवसांची स्थगिती दिली. आता या प्रकरणाची सुनावणी 14 मे रोजी होणार आहे. मीनलचा व्हिसाची मुदत 22 मार्च रोजी संपली. तरीही ती भारतात बेकायदेशीरपणे राहत होती. जम्मूमधील हंडवाल येथील रहिवासी मुनीर 2017 मध्ये सीआरपीएफमध्ये सामील झाला होता. 

राज्यासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: भारताने तो निर्णय घेतल्यास आम्ही लगेच हल्ला करणार; पाकिस्तानचा थयथयाट, पुन्हा पोकळ धमकी