Raid 2 Box Office Collection Day 3: अजय देवगणची (Ajay Devgn) फिल्म 'रेड 2' (Raid 2) हा चित्रपट केवळ वर्षातील तिसरा सर्वात मोठा ओपनर चित्रपट बनला नाही, तर 1 मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर, 3 मे पर्यंत, सिनेमानं धुवांधार कमाई केली आहे. 'रेड 2' सोबतच बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 'रेट्रो' (Retro) आणि 'हिट द थर्ड केस' (HIT: The Third Case) हे दोन मोठे दाक्षिणात्य सिनेमे (South Movie) रिलीज झाले होते. पण, या दोन्ही चित्रपटांना पछाडत, 'रेड 2' नं अवघ्या तीनच दिवसांत एक नवा विक्रम रचला आहे. अजय देवगणच्या 'रेड 2'नं कोणते विक्रम रचले? सविस्तर पाहुयात...
'रेड 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'रेड 2'नं ऑफिशिअल आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी 19.71 आणि दुसऱ्या दिवशी 13.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या फिल्मची दोन दिवसांची कमाई 32.76 कोटी रुपये झाली आहे. तर, तिसऱ्या दिवशी 10.10 वाजेपर्यंत सॅकनिल्कच्या ताज्या आकडेवारीनुसार, हा कमाईचा आकडा 16.05 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकूण कमाईबाबत बोलायचं झालं तर, 48.81 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, ही आकडेवारी सुरुवातीच्या कलेक्शनवरुन देण्यात आली आहे. त्यामुळे या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतात.
'रेड 2'नं वसूल केलं भांडवल
बॉलीवुडशादीज डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, 'रेड 2'ला 40 कोटी रुपयांमध्ये रुपेरी पडद्यावर साकारण्यात आलंय. सॅकनिक्लनं दिलेल्या वर्ल्डवाइड आकडेवारीनुसार, दोनच दिवसांत फिल्मनं 4.50 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. यामध्ये जर तिसऱ्या दिसाचं कलेक्शन अॅड केलं, तर फिल्मचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन 56.55 कोटी रुपये होतं. म्हणजेच, फिल्म आता जी कमाई करेल, तो सर्व नफा असेल आणि त्यावरुनच ठरेल अजय देवगणची फिल्म हिट झाली की, फ्लॉप.
दरम्यान, राजकुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड 2' मध्ये अजय देवगण इनकम टॅक्स ऑफिसर अमय पटनायक यांची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच रितेश देशमुख आणि अमित सियाल यांनाही चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा मिळाली आहे. वाणी कपूर आणि सौरभ शुक्ला हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :