कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ उद्या (17 नोव्हेंबर) सीएम योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) कोल्हापूर शहरात येत आहेत. तपोवन मैदानात कोल्हापुरातील तपोवन मैदानात त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
23 तारखेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल
योगी आदित्यनाथ यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी तरुण उत्सुक आहेत. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा खूप मोठा फरक पडणार आहे. विरोधकांनी जरी प्रियांका गांधी यांची सभा घेतली असली, तरी जनतेने ठरवलं आहे 20 तारखेला कुणाला मतदान करायचं. त्यामुळे 23 तारखेचा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल असा विश्वास अमल महाडिक यांनी व्यक्त केला.
प्रियांका गांधींची गांधी मैदानात तोफ धडाडणार
दरम्यान, प्रियांका गांधी आज (16 नोव्हेंबर) पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत असल्याने जिल्हा काँग्रेसमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यापूर्वी काँग्रेस घराण्यातील इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांचा करवीर नगरीमध्ये राजकीय सभाच्या निमित्ताने दौरा झाला असला, तरी प्रियांका गांधी यांचा हा पहिलाच कोल्हापूर दौरा होत असल्याने या दौऱ्याची उत्सुकताच आणली वाढली आहे. प्रियांका गांधी यांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्याच हस्ते बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संविधान संमेलनाला सुद्धा त्यांनी संबोधित केलं होतं. त्यामुळे अवघ्या 40 दिवसांमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा कोल्हापूर दौरा होत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान सभा यशस्वी होण्यासाठी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या