मुंबई: भारतीय शेअर बाजारातील सर्वच शेअर्समध्ये आज वाढ झाल्याने शेअर बाजार चांगलाच वधारल्याचं दिसून आलं. सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाली असून आज सेन्सेक्स 874 अंकांनी वधारला तर निफ्टीही 256 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.53 टक्क्यांची वाढ होऊन तो 57,911 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.49 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,392 वर पोहोचला आहे.
आज 2252 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1089 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 96 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, आयटी, फार्मा यासह सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये 1-2 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही एक टक्क्यांची वाढ झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Eicher Motors, Coal India, M&M, Maruti Suzuki आणि Adani Ports या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Cipla, Hindalco Industries, Tata Steel, ONGC आणि JSW Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
भारतीय शेअर बाजाराची आज चांगली सकारात्मक सुरुवात झाली. जागतिक पातळीवरील शेअर बाजारातून मिळत असलेल्या सकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आली. शेअर बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स 400 अंकानी वधारत 57,458 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये जवळपास 100 अंकाच्या तेजीसह 17,200 अंकावर सुरू झाला.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Eicher Motors- 4.52 टक्के
- Coal India- 3.92 टक्के
- M&M- 3.38 टक्के
- Maruti Suzuki- 2.77 टक्के
- Adani Ports- 2.76 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Cipla- 1.33 टक्के
- Tata Steel- 0.92 टक्के
- Hindalco- 0.87 टक्के
- ONGC- 0.77 टक्के
- JSW Steel- 0.63 टक्के
महत्त्वाच्या बातम्या: