Tata Steel Stopping Business With Russia: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातील प्रमुख पोलाद कंपनी टाटा स्टीलने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलने म्हटले आहे की, ते रशियासोबत व्यवसाय करणे बंद करणार आहे. भारतीय स्टील कंपनीने बुधवारी याबाबत माहिती दिली.


युद्धामुळे घेण्यात आला हा निर्णय 


भारतीय पोलाद क्षेत्रातील दिग्गज टाटा स्टीलची युरोपीयन शाखेने बुधवारी  सांगितले की, ते रशियासोबत व्यवसाय करणे थांबवत आहे. टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे की, "रशियामध्ये टाटा स्टीलचे कोणतेही काम किंवा कर्मचारी नाहीत. आम्ही रशियासोबतचा व्यवसाय बंद करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे."


कच्च्या मालाचा पुरवठा


टाटा स्टीलने सांगितले की भारत, यूके आणि नेदरलँड्समधील कंपनीच्या सर्व स्टील उत्पादन साइट्सने रशियावरील त्यांचे अवलंबित्व संपवण्यासाठी कच्च्या मालाचा पर्यायी पुरवठा केला आहे.


कंपनी शेअर्सचे वितरण करण्याचा करत आहे विचारात 


टाटा स्टीलचे संचालक मंडळ 3 मे रोजी कंपनीच्या शेअर्सचे वितरण करण्याच्या प्रस्तावावर विचार करणार आहे. याबाबत कंपनीने नुकतीच माहिती दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की, 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील आर्थिक निकालांवर संचालक मंडळ 3 मे रोजी होणाऱ्या बैठकीत विचार करणार आहे. कंपनीने सांगितले की, बैठकीत संचालक मंडळाने ठरवलेल्या पद्धतीने 10  रुपये मूल्याचे शेअर्स विभाजित करण्याचा विचार केला जाईल. यासाठी नियामक मंजुरींशिवाय भागधारकांचीही मान्यता घेतली जाणार आहे. बैठकीत संचालक मंडळ 2021-22 या आर्थिक वर्षासाठी लाभांशाची शिफारस देखील करू शकते.


इतर महत्त्वाच्या बातम्या: