Nagpur News नागपूर : नागपूरातील सर्वात उंच इमारत असलेल्या ‘कुकरेजा इन्फिनिटी’ला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने क्लिनचीट दिली आहे. शहरातील (Nagpur News) सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या सिव्हिल लाईन परिसरातील कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Kukreja Infrastructure) या 28 मजली इमारतीला विरोध करणारी संरक्षण विभागाची (Defense Department) याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे. नागपूर महानगरपालिका, अग्निशमन विभाग, एअरोपर्टल ॲथॅारीटीची परमिशन घेऊन 28 मजली इमारत बांधल्याचा कुकरेजा यांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद केला. मात्र, याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर संरक्षण विभागाची याचिका फेटाळण्यात आलीय 


भाजप नेत्याच्या कुकरेजा इमारतीला न्यायालयाकडून क्लिनचीट


शहरातील सर्वात उंच इमारती विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. संरक्षण विभागाच्या कामठी स्टेशन कमांडरने नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली होती. दरम्यान या प्रकल्पाचे बांधकाम अवैध असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तर हा प्रकल्प सिविल लाइन्समधील संरक्षण विभागाच्या परिसरापासून केवळ 76 मीटर जवळ आहे. त्यामुळे नियमानुसार सैन्य दलाच्या आस्थापणे पासून 100 मीटर वरील बांधकामाची परवानगी घ्यावी लागते. मात्र या प्रकल्पाचे बांधकाम करण्यापूर्वी सैन्य दलाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नाही.


परिणामी, भविष्यात संरक्षण विभागाला होणारा धोका लक्षात घेता महानगरपालिकेने प्रकल्प विकासाची परवानगी देऊ नये, बांधकाम पूर्णत्वाचे आणि भोगवटा प्रमाणपत्र जारी करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. परिणामी, इमारती विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संरक्षण विभागाकडून याचिका दाखल करण्यात आली होती . याप्रकरणी दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर ही याचिका फेटाळण्यात आलीय. कुकरेजा आणि महापालिकेच्यावतीने बांधकाम नियमाप्रमाणेच असल्याचा दावा ही यावेळी करण्यात आला आहे. 


हे ही वाचा