नागपूरः रंजन कला मंदिराच्या बालरंजन या बालनाट्य विभागाने सायंटिफिक सभागृहात तीन बालनाटकांची मेजवानी रसिकांना दिली. सई परांजपे लिखित सळो की पळो, राधिका देशपांडे लिखित आई मला भूक लागली व प्रसन्न शेंबेकर लिखित ट्राफिक या तिन्ही बालनाटकांचे दिग्दर्शन संजय पेंडसे यांनी केले.


बालकलाकारांच्या कार्यशाळेतून आकाराला आलेल्या या तिन्ही बालनाटकांची निर्मिती नचिकेत म्हैसाळकर, सौरभ मसराम, श्रुता सोरटे, डॉ. रवी गीऱ्हे, डॉ. साधना थोते, स्वप्निल जतकर, श्रावणी चौधरी, रौनक पळसापुरे, पुष्पक उके यांनी केली. 


कार्यशाळेचे महत्त्व अभिनेता सचिन देशपांडे यांनी विषद केले. नाटकांमध्ये समर्था सोरते, अवनी महाजन, आव्या मेराई, आनंदी मुडे, श्राव्या गायकवाड, सखा देशपांडे, समीरा गढीकर, आदित्री उमरेडकर, अर्जुन दौलतकार, श्रामेन शेंडे, सुकृत जोगळेकर, सारा सुभेदार, क्रितिका नगराळे, आद्या तोमर, मिताली देशपांडे, आर्यन चव्हाण, शाश्वत हरताळकर, सिद्धी डोंगरे, अनुश्री क्षीरसादर, आर्या पाठक या बालकलावंतांच्या भुमिका होत्या.




'आई मला भूक लागली' या नाटकातील बालकलावंतांचे क्षण


सभागृह कार्यक्रमांनी गजबजले


कोरोनामुळे मागिल तीन वर्षांपासून बंद असलेल्या सभागृहात कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे. शहरातील वसंतराव देशपांडे सभागृह, कविवर्य सुरेश भट सभागृह, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रांमध्ये कार्यक्रमांचे आयोजनांनी वेग धरला आहे. दर विकेंडला तर आयोजकांना बुकिंग देखील उपलब्ध होत नसल्याची माहिती आहे. मात्र वाढलेल्या कार्यक्रमांमुळे शहरातील कलाप्रेमींना मेजवानी मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Nagpur : उपराजधानी बनतेय 'हुक्का पार्लर हब'! शहरात अनेक ठिकाणी भरते नशेची मैफिल


Nagpur ZP News : शिक्षकांकडून कधी होणार वसुली? वर्षभरापासून दडविली फाईल


Maharashtra Political Crisis : बंडखोर आमदारांना दिलासा, झिरवाळांना नोटीस; पुढील सुनावणी 11 जुलैला, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील टॉप 10 मुद्दे


'तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाहीत, मातोश्रीत कुणाला एन्ट्री नाही, मग राज्य कोण चालवतंय?', आमदार जायस्वालांचा सवाल


मोठी बातमी! बंडखोर मंत्र्यांना मोठा धक्का, खात्यांचं फेरवाटप, मुख्यमंत्र्यांचा निर्णय; आता कुणाकडे कोणतं खातं...