Siddhant Shirsat Case : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या (VITS Hotel) लिलावावरून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर आरोप करण्यात आले होते. वेदांत हॉटेल विकत घेतल्याच्या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचे संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट (Siddhant Shirsat) यांनी जाहीर केले होते. मात्र, पालकमंत्र्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी यासंदर्भात अद्याप प्रशासनाला पत्र दिलेले नाही. दरम्यान, लिलावात निश्चित झालेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम भरण्याची मुदत आज (20 जून) संध्याकाळ पर्यंत आहे. असे असताना अद्याप कंपनीने पैसे भरले नसल्याची माहिती समोर आली आहे.
नियम काय सांगतो?
लिलाव झाल्यानंतर लिलावाची 25 टक्के रक्कम 30 दिवसात भरणे बंधन कारक आहे. तर उर्वरित 75 टक्के रक्कम ही पुढील 60 दिवसात भरणे बंधन कारक आहे. 30 दिवसात 25 टक्के रक्कम न भरल्यास लिलाल रद्द करण्यात येईल आणि अनामत रक्कम ही जप्त करण्यात येईल असा नियम आहे. या प्रकरणी 20 लाख ही अनामत रक्कम आहे.
... तर लिलाव होईल रद्द
अद्याप संबंधित कंपनीकडून कोणतेही अधिकृत माघारीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झालेले नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी राठोड यांनी दिली आहे. प्रशासनाने लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार बोली जिंकणाऱ्या कंपनीला 25 टक्के रक्कम 20 जूनपर्यंत भरण्याचे निर्देश दिले आहेत. ही अंतिम मुदत शुक्रवारी संपणार आहे. या कालावधीत भरणा न झाल्यास लिलाव रद्द करण्यात येईल, असे राठोड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आर्थिक अनियमितता, पक्षपातीपणा असल्याचे सांगत हॉटेलची बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री केल्याचा आरोप केला. त्यांनी ही मालमत्ता किमान 110 कोटी रुपये किमतीची असल्याचा दावा केलाय. या वादानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी, मुलगा सिद्धांत लिलावातून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. सिद्धांत शिरसाट लिलाव माघारीचे पत्र प्रशासनाला पुढील दिवशी सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याला जवळपास एक महिना झाला आहे. त्यामुळे आज अखेरच्या दिवशी या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, हे हॉटेल खरेदी करणाऱ्यांनी 25 टक्के रक्कम लिलावाच्या एक महिन्यात आणि 75 टक्के रक्कम लिलावानंतर तीन महिन्यात देणं बंधनकारक होतं. जर असं केलं नाही तर अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असा नियम आहे, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे एसटीएम व्यंकट राठोड यांनी दिली आहे. आता संजय शिरसाट नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या