Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्स तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल 1 कोटी 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून (Chhatrapati Sambhajinagar Police) मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे.
दरम्यान, 24 जूनच्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था केल्याच काही फोटोमधून पुढे आलं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पोलिस खात्याची भूमिका संशयास्पद
गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्याने कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी अंती काय सत्य बाहेर येतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ओडीसा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीसाठी येतोय गांजा, रेल्वे गुन्हे शाखेची मोठी कारवाई
परराज्यातून रेल्वेने महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणाऱ्या दोन गांजा तस्करांना कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मेहताब आलम इर्शाद आलम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी अशी अटक केलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. यांनी हा गांजा ओडिसा राज्यातील संबलपुर येथून आणला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांकडून चार लाख 17 हजार रुपये किमतीचा 20 किलो 869 ग्राम गांजा कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.हा गांजा हे दोघे कुणाला विकनार होते याचा तपास पोलीस करत आहेत .
कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर चार व पाच वर कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना त्यांना दोन इसम हे संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. पोलिसांना संशय बळवतात त्यांनी त्यांच्या बॅगेची झाडाझडती घेतली या बॅगेत तब्बल 20 किलो होऊन अधिक गांजा आढळून आला. पोलिसांनी मेहताब आलम इर्शाद आलम शेख आणि लाल अहमद अमीन कोटकी या दोघांना तत्काळ ताब्यात घेतले .त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा गांजा ओडिसा राज्यातील संबलपुर येथून आणला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून हे दोघे हा गांजा कुणाला विकणार होते यापूर्वी किती वेळा बेकायदेशीरपणे गांजा ते परराज्यातून घेऊन आले आहेत याचा तपास सुरू केलाय
हे ही वाचा