Vat Purnima Maharashtra Viral news : वटपौर्णिमेच्या (Vat Purnima) दिवशी स्त्रिया व्रत करतात आणि या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, उत्तम आरोग्य लाभावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. मात्र दुसरीकडे याच दिवशी भांडखोर पत्नीमुळे संसार उघड्यावर पडलेल्या पत्नीपीडितांकडून देखील आगळी-वेगळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज भागातील करोडी येथील आश्रमात ही आगळी-वेगळी पौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पत्नीपीडितांनी पिंपळाची पूजा करुन आणि प्रदक्षिणा घालून भांडखोर पत्नीपासून वाचवण्यासाठी देवाला साकडे सुद्धा घातले आहे.
दरवर्षी छत्रपती संभाजीनगरच्या करोडी येथील आश्रमात पत्नी पीडितांच्या वतीने वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते. यावेळी पत्नीपीडितांकडून विविध घोषणा देत पिंपळाच्या झाडाला 121 उलट्या प्रदक्षिणा मारण्यात येते. तसेच पिंपळाची पूजा करुन आणि प्रदक्षिणा घालून भांडखोर पत्नीपासून वाचवण्यासाठी देवाला साकडे सुद्धा घातले. गेल्या कित्येक वर्षांपासून पत्नीपीडितांकडून हा उपक्रम वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी राबवला जात असतो. यावेळी मोठ्याप्रमाणावर पत्नीपीडित आपला सहभाग नोंदवत असतात. तर शुक्रवारी देखील हा उपक्रम करोडीतील पत्नीपीडित आश्रमात राबवण्यात आला आहे.
देशात बहुतांश कायदे महिलांच्या बाजूने असल्याने अनेक महिला या कायद्याचा दुरुपयोग करून किरकोळ कारणावरुन आपल्या पतीविरोधात गंभीर तक्रारी नोंदवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. विशेष म्हणजे अशा तक्रारीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पत्नीपीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पत्नीपीडितांना सावरण्यासाठी अॅड. भारत फुलारे यांनी वाळू भागातील करोडीत 6 वर्षांपूर्वी आश्रम उभारला. विशेष म्हणजे या आश्रमात देशभरातील जवळपास 10 हजार 200 पत्नीपीडितांनी नोंदणी केलेली आहे. तसेच याच ठिकाणी प्रत्येक रविवारी पत्नी पीडितांना ॲड. फुलारे कायदेशीर मार्गदर्शन करत असतात.
पिंपळ पौर्णिमेच्या कार्यक्रमाला यांची उपस्थिती
शुक्रवारी करोडीतील पत्नीपीडित आश्रमात साजरा करण्यात आलेल्या पिंपळ पौर्णिमेच्या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, संजय भांड, प्रवीण कांबळे, भिकन चंदन, अॅड. अमोल घुगे, अॅड. अमोल होनमाने, श्रीराम तांगडे आदी पत्नीपीडितांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी पत्नीपीडितांनी पिंपळाची पूजा करुन आणि प्रदक्षिणा घालून भांडखोर पत्नीपासून वाचवण्यासाठी देवाला साकडे सुद्धा घातले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Vat Purnima 2023 : आज वटपौर्णिमेचा सण..वाचा पूजेची योग्य वेळ, विधी आणि व्रताचं महत्त्व