Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेची निवडणूकVidhan Sabha 2024)आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळ जवळ सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी आपली कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया इत्यादि बाबी राज्यातील पक्षाकडून सध्या सुरू  आहे. परिणामी ही निवडणूक जिंकण्यासाठी स्थानिक पातळीवरही पक्षाकडून आतापासूनच  रणनीती आखण्यात येत आहे.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) चूरशीच्या लढतीत पराभव  स्वीकारावा लागलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आता विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास (Election 2024) चंद्रकांत खैरे इच्छुक असल्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आदेश दिल्यास पश्चिममधून मी निवडणूक लढवणार, मला गद्दारांना पाडायचं आहे. असा निर्धारही चंद्रकांत खैरेंनी केला आहे. त्यामुळे आता खैरेंच्या छत्रपती संभाजीनगर मधून लढण्याबाबतच्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


गद्दारांना पाडण्यासाठी मी विधानसभा लढणार- चंद्रकांत खैरे


उद्धव ठाकरे यांच्याकडून जर आदेश आल्यास संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी मी लढेल, बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी देण्याचं लोकांना पटत नाही. राजू शिंदे यांना अंबादास दानवे यांनी प्रवेश मला विचारून दिल नाही. मला पाडण्यासाठी राजू शिंदे यांनी मदत केली, त्यामुळे अशा लोकांना कोण मदत करणार. परिणामी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक आहे. माला गद्दारांना धडा शिकवायचा आहे, म्हणून मी विधानसभा लढणार, अशी जाहीर घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.


'या' मतदारसंघातला मी पहिला हिंदू आमदार- चंद्रकांत खैरे


या मतदारसंघात पहिला हिंदू आमदार मी झालो होतो. सध्या यांचा पैश्यांचा उन्मद सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मला पैश्याने पाडण्यात आले. आता शरद पवार आणि काँग्रेसचा वलय आहे. त्यामुळे 140 जागा आम्ही लढवणार असल्याची तयारी आहे. तर आमची 103 जिंकणार असल्याची तयारी असल्याचा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी बोलताना व्यक्त केला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या