छ्त्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं.  लाडकी बहीण योजना यशस्वी झालेली योजना आहे. काहींना वाटतं होतं सरकार फक्त आमिष दाखवत आहे, पैसे येणार नाहीत. मात्र, यायला सुरुवात झाली आहे.  काही दलाल सक्रीय झाले आहेत. पुरुष देखील फॉर्म भरत आहेत. त्यांच्यावर कारवाई होईल असं शिरसाट म्हणाले. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला खीळ बसावी असे काहींना वाटते मात्र तसे होऊ देणार नाही. काही फॉर्ममधे गाढव आणि मुलांचे फोटो आढळले आहेत. या प्रकाराचा संशय विरोधकांवर जात आहे.गैर प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, कारवाई केली जाईल, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला. 


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या लोकांना काहीच सुचत नाही. पंतप्रधान न्यायमूर्ती यांच्या घरी गेले त्यावरून वादंग निर्माण होतोय. अनेक न्यायमूर्ती यापूर्वी अनेक ठिकाणी गेले आहे. आरतीला गेले म्हणून तर्क वितर्क लढविले जात आहे ते साफ चूक आहे.  गणेशोत्सव सार्वजनिक कार्यक्रम आहे. वेगवेगळे लोक एकत्र येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेवर यांचा विश्वास राहिलेला नाही असे दिसते, असा आरोप शिरसाट यांनी केला. 


धर्माराव बाबा अत्राम यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याबद्दल बोलताना शिरसाट यांनी आम्हाला बाप लेकीच्या भांडणात पडणं योग्य वाटत नसल्याचं म्हटलं.  


राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन जे सांगितले आहे ते रेकॉर्डवर आहे.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कधीही काँग्रेसने मानलेले नाही. आरक्षण रद्द करण्याचा डाव त्यांनी स्पष्ट बोलून दाखवला आहे, असा आरोप संजय शिरसाट यांनीकेला. काँग्रेस मराठा समजला आरक्षण देणार तर नाहीच ,मात्र आरक्षण रद्द करतील असा आरोप देखील त्यांनी केला. 


लालबागचा राजा देशात प्रसिद्ध आहे.व्हीआयपी येतात त्यांना वेगळी मुभा दिली जाते हे सत्य आहे. मात्र, काल जे व्हिडिओ बघितले तसे होता कामा नये ते चुकीचं आहे. भाविक 18 तास रांगेत असतात त्यानं दर्शन मिळाला पाहिजे सर्व सामन्यांना न्याय मिळाला पाहिजे, असंही संजय शिरसाट म्हणाले.
 
ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे. मराठा समजला देखील न्याय मिळावा ही भूमिका मुख्यमंत्री यांची आहे.ते सर्व समाजाला  सोबत घेऊन चालत आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले.


इतर बातम्या :



Ladki Bahin Yojana : फोटो अन् आधार कार्ड महिलांचं, अर्जावर नाव पुरुषांचं, लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करणाऱ्या भावांचा भांडाफोड