Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) महायुतीत (Mahayuti) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही बाजूने या मतदारसंघावर दावा केला जात आहे. अशात भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये संभाजीनगरच्या बाबतीत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र, आजच्या भेटीत कोणतेही राजकीय चर्चा झाली नसून, एका खाजगी कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री यांची भेट घेतली असल्याची माहिती प्रशांत बंब यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे.
महायुतीत संभाजीनगरचा तिढा कायम?
महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाकडे जाणार याचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एकीकडे शिंदेसेनेकडून या मतदारसंघावर दावा केला जात असून, दुसरीकडे भाजपकडून देखील याच मतदारसंघावर हक्क दाखवला जात आहे. त्यामुळे संभाजीनगरचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर देखील संभाजीनगरच्या जागेचा वाद कायम आहे.
भुमरेंचा स्वतःचा मतदारसंघ जालना लोकसभेत...
महायुतीकडून संभाजीनगर लोकसभेतून निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या संदिपान भुमरे यांचा स्वतः पैठण विधानसभा मतदारसंघ (Paithan Assembly Constituency) जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) आहे. त्यामुळे भुमरे यांचा पैठणमधील मतदान त्यांना संभाजीनगरमधून मिळू शकणार नाही. तसेच अनेक लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव असलेल्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर भुमरेंची ताकद कमी पडेल असे मत भाजपमधील काही नेत्यांचे असल्याची चर्चा आहे.
ठाकरे गटाकडून पुन्हा खैरे मैदानात...
महायुतीचा छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार अजूनही निश्चित नसल्याचे चित्र आहे, अशात दुसरीकडे महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना मैदानात उतरवले आहे. खैरे यांनी मागील काही दिवसांपासून प्रचाराला देखील सुरवात केली आहे. तर, 13 एप्रिल रोजी खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालय उदघाटन केले जाणार आहे. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहे. तसेच 22 एप्रिलरोजी खैरे यांचा नामांकन अर्ज दाखल केला जाणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे हजर राहणार आहे. तसेच, 10 मे रोजी खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :