Chhatrapati Samabhajinagar : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी बॉम्बस्फोट (Rameshwaram Cafe Bomb Blast Case) झाला होता. आरोपीने कॅफेमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली आणि त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला होता. या स्फोटामध्ये सुमारे 10 जण जखमी झाले होते. आता या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एनआयएकडून (NIA) मोठी कारवाई करण्यात आली आहे. 


रामेश्वरम कॅफे बॉम्ब स्फोट प्रकरणात सुरुवातीला ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’शी (पीएफआय) संबंधित एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने याप्रकरणी काही दिवसांपूर्वी साई प्रसाद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. हा व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या नेता असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता.


छत्रपती संभाजीनगरमधील तीन तरुणांची चौकशी 


बंगळुरूच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात शहरातील तीन तरुणांची एनआयएकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात हव्या असलेल्या संशयित आरोपींसोबत तिघांनी व्यवहार होता, असे निष्पन्न झाल्याने एनआयएकडून या तीन तरुणांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. चौकशी करण्यात आलेल्या तिघांनी संशयितांसोबत क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार केल्याची देखील माहिती मिळत आहे. आता या प्रकरणात काय धागेदोरे सापडणार? हे महत्वाचे ठरणार आहे. 


रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाबाबत काँग्रेसचा दावा


काँग्रेसने भाजप कार्यकर्त्याबाबत ट्वीट केले होते की, 1 मार्च रोजी बंगळुरुच्या रामेश्वरम कॅफेमध्ये ब्लास्ट झाला होता. या ब्लास्टमध्ये 10 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याचे कनेक्शन स्फोटाशी आहे. भाजपचे दहशतीशी कनेक्शन का असतात?, असे दावे काँग्रेस पक्षाने ट्वीटरच्या माध्यमातून केले आहेत.


कॅफेतील सुरक्षेत वाढ 


दरम्यान, एनआयएने म्हटले होते की, दहशतवादी कृत्य असल्याने आम्ही साक्षीदारांची नावे किंवा त्यांची ओळख उघडपणे सांगणार नाहीत. कारण त्यांची ओखळ सांगितल्यास तपासात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे फरार आरोपीच्या अटकेबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे म्हटले होते. तर स्फोटानंतर काही दिवसात कॅफे पुन्हा एकदा सुरु करण्यात आला. आता कॅफेतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांची तपासणी करण्यासाठी कॅफेच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Pune News : समोसामध्ये बटाट्याऐवजी कंडोम, दगड आणि तंबाखू ; पुण्यातील किळसवाण्या प्रकाराने खळबळ


Pune : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने जीवन संपवलं, अंगावर मारहाणीच्या खुणांमुळे पोलिसांचा वेगळाच संशय