Nylon Manja : नायलॉन मांजामुळे मनुष्य आणि प्राण्यांना होणाऱ्या गंभीर दुखापती रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे सांगत नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना असे निर्देश देण्यात आले आहेत. खरोखरच आता हा विषय शिकवला जावा का ती वेळ आली आहे का, यासंदर्भातील रिपोर्ट वाचा.


मांजा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे निर्देश


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये अवघ्या नऊ महिन्याच्या चिमूरडीच्या गळ्याला नाईलान माझ्यामुळे दुखापत झाली आहे. इनाया अशपाक शेख वय 9 महिण्याचा मुलीचं नाव आहे. इनायाची आई तिला घेऊन चार चाकी गाडीतून खाली उतरली आणि समोरून मांजा येऊन चिमुरड्याच्या गळा चिरून गेला. चिमुकल्या इनायावर वैजापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. फक्त नववर्षाची चिमुरडीच नाही तर छत्रपती संभाजी नगरमध्ये गेल्या महिनाभरात पन्नासपेक्षा अधिक लोक जखमी झाले तर, वीस पेक्षा अधिक पक्षाचा मृत्यू केवळ नायलॉन माजांमुळे झाला आहे.


चायनीज मांजा आला कसा?


सध्या देशभरामध्ये अनेक ठिकाणी पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यातून पतंग काटाकाटीच्या स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे आपला पतंग कटला जाऊ नये, यासाठी चायनीज मांजानं भारताच्या मार्केटमध्ये इंट्री केली आणि हाच मांजा जीवघेणा ठरवू लागला. कसा तयार होतो चायनीज मांजा जाणून घ्या.


चायनीज मांजा कसा तयार होतो?


भारतातच प्लॅस्टिक, नायलॉनपासून बनवलेल्या मांजाला चायनीज मांजा म्हटलं जातो. मांजा नावाचा हा चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीने बंगळुरूमध्ये सुरू केला. प्लास्टिक मांजा लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असे नाव दिलं. काचेचे तुकडे, धातू आणि लोखंडाचे तुकडे डिंकात मिसळले जातात आणि मांजावर लावले जातात, ज्यामुळे चायनीज मांजा बनतो. याशिवाय या मांजात अनेक रसायने मिसळली जातात, जी जीवघेणी ठरतात.


चायनीज मांजामुळे अनेकांचा बळी


नायलॉन मांजा घातक असल्यामुळे छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका दाखल करून शालेय अभ्यासक्रमातच दुष्परिणाम शिकवले गेले पाहिजेत, असे निर्देश दिले आहेत. एवढंच नाही तर खंडपीठाच्या आदेशानंतर नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई व्हायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यामध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. नायलॉन मांजा संदर्भात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आणि तर अनेक ठिकाणी लोक गंभीर त्या जखमी झाले आहेत, तर काहींचा जीवही गेलाय.



नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई 


नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईही झाली आहे. यामध्ये संभाजीनगरमध्ये 27, हिंगोली 18, छत्रपती संभाजीनगर शहर 19, ग्रामीण 5, नांदेड 7, नंदुरबार 12, जळगाव 8 बीड 2, परभणी 1, जालना 1, धुळे 1 गुन्हे दाखल झाले आहेत.


नायलॉन मांजामुळे पतंग उडवण्याची प्रथा ठरतेय जीवघेणी


मकर संक्रांतीला उत्सव म्हणून पतंग उडवण्याची प्रथा आहे, पण हीच प्रथा आता जीव घेणे ठरतेय. आपला पतंग कात्राकाठीचा खेळ आणि त्यासाठी वापरलेला नायलॉनचा मांजा कुणाचा तरी जीव घेतोय, त्यामुळे आता माणूस होणे गरजेचे आहे आणि खंडपीठांना दिलेले निर्देशही गंभीरपणे घेणे गरजेचे आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI