छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात (Marathwada) पाणी टंचाई (Water Shortage) जाणवत असल्याचे चित्र असून, ऐन फेब्रुवारी महिन्यातच मराठवाड्यातील 280 गावांना 256 टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करावा लागत आहे. जालना (Jalna) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) या दोन जिल्ह्यात 255 टँकरने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी विभागात एकूण 337खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडून (Divisional Commissioner Office) देण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळ्यात अशी परिस्थिती असेल तर भर उन्हाळ्यात मराठवाड्याला भीषण दुष्काळाचा (Drought) सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मराठवाड्यातील टँकर आकडेवारी...

जिल्हा  गावे  वाड्या   टँकर संख्या
छत्रपती संभाजीनगर  117 14 144
जालना  58 25 111
बीड  01 03 01

खाजगी विहीर अधिग्रहण आकडेवारी...

जिल्हा  गाव संख्या  विहीर संख्या 
छत्रपती संभाजीनगर 75 86
जालना  016 102
परभणी 41 52
नांदेड  01 02
बीड  12 14
धाराशिव  28 55

मराठवाडा धरण पाणीसाठा...

धरण  पाणीसाठा 
जायकवाडी 37 टक्के
सिद्धेश्वर  38 टक्के
यलदरी  55 टक्के
माजलगाव 4 टक्के
मांजरा  15 टक्के 
उर्ध्व पेंनगंगा  67 टक्के 
निम्न तेरणा  10 टक्के 
निम्न मणार  47 टक्के 
विष्णूपुरी  56 टक्के 
निम्न दुधना  16 टक्के 
सीना कोळगाव  0 टक्के


उन्हाळ्यात अधिक पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता 

मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने विभागातील आठही जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आत्तापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. अनेक गावातील विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आत्ताच अशी परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात अधिक पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 

जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव...

यंदा कमी पाऊस झाल्याने आता त्याचे परिणाम जाणवत आहे. जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यामुळे मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट पाहायला मिळत आहे. सोबतच, जायकवाडी धरणातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी जायकवाडी प्रकल्पातून 4 आवर्तने दिली जातात, मात्र यंदा हे पाणी सोडले जाणार नाही. सध्या जायकवाडी धरणात 38.42 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जालना जिल्ह्यासह औद्योगिक वसाहतींना जायकवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो.

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी! जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट