Jayakwadi Dam Water Storage : मागील वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने मराठवाड्यात (Marathwada) पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) केवळ 15.62 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे उन्हाचा पारा वाढत असल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन (Water Evaporation) देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशात अनेक जिल्ह्यात टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील टँकरचा आकडा थेट 1 हजार 63 वर पोहचला आहे. ज्यात सर्वाधिक 443 टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) सुरु आहेत.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा (Jayakwadi Dam Water Level)
- जायकवाडी धरण पाणी पातळी फुटामध्ये : 1501.07 फूट
- जायकवाडी धरण पाणी पातळी मीटरमध्ये : 457.526 मीटर
- एकूण पाणीसाठा दलघमी : 1077.285 दलघमी
- जिवंत पाणीसाठा दलघमी : 339.179 दलघमी
- जायकवाडी धरण पाणीसाठा टक्केवारी : 15.62 टक्के
- जायकवाडी धरण पाण्याची आवक : 00
- जायकवाडी धरण बाष्पीभवन : 1.088
- उजवा कालवा विसर्ग : 900 क्युसेक
- डावा कालवा विसर्ग : 2000 क्युसेक
मागील वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा (Last year current day water storage)
- मागील वर्षी आजच्या दिवशीचा उपयुक्त पाणीसाठा दलघमी : 1205.616 दलघमी
- मागील वर्षी आजच्या दिवशीची उपयुक्त टक्केवारी : 55.53 टक्के
- 1 जून 2023 पासुन एकूण पाण्याची आवक : 876.8967 दलघमी
मराठवाड्यात 1 हजार 63 टँकरने पाणीपुरवठा...
मराठवाड्यात यंदा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे मराठवाडा टँकरवाड्याच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण मागील महिन्याभरात अचानक टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मराठवाड्यात आज घडीला 1 हजार 63 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक गावात पाण्याचा स्रोतच नसल्याने गावकऱ्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अशावेळी या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील 720 गावं आणि 237 वाड्यांवर एकूण 1 हजार 63 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ज्यात 15 शासकीय आणि 1048 खाजगी टँकरचा समावेश आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती टँकर सुरु....
जिल्हा | गावं संख्या | वाड्या संख्या | शासकीय टँकर | खाजगी टँकर | एकूण टँकर |
छत्रपती संभाजीनगर | 289 | 48 | 00 | 443 | 443 |
जालना | 219 | 61 | 09 | 334 | 343 |
बीड | 162 | 126 | 02 | 197 | 199 |
परभणी | 01 | -- | -- | 01 | 01 |
हिंगोली | 00 | 00 | 00 | 00 | 00 |
नांदेड | 01 | 02 | 00 | 03 | 03 |
धाराशिव | 40 | -- | -- | 66 | 66 |
लातूर | 08 | -- | 04 | 04 | 08 |
एकूण | 720 | 237 | 15 | 1048 | 1063 |
इतर महत्वाच्या बातम्या :