Marathwada Rain Update : राज्यात सर्वत्र धो-धो पाऊस होत असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलं आहे. मात्र मराठवाड्यात (Marathwada) अजूनही अपेक्षित पाऊस (Rain) झालेला नसल्याने चिंता वाढली आहे. मागील 53 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. तर नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. तर विभागात अजूनही 13 टक्के पावसाची तूट असून, शेतकरी संकटात सापडला आहे. 


कुठे नद्यांना पूर आलंय, तर कुठे धबधबे ओसंडून वाहत आहे. तर काही ठिकाणी अक्षरशः गावात पाणी घुसल्याने बचावकार्य करण्याची वेळ आली आहे. एकीकडे राज्यातील अनेक भागात अशी परिस्थिती असतांना मराठवाड्यात मात्र वेगळच चित्र आहे. मराठवाड्यात मागील 53 दिवसांत फक्त 37.8 टक्के पाऊस झाला आहे. नांदेड वगळता एकाही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागातील प्रकल्पात फक्त 36.85 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी हाच पाणीसाठा76.40 टक्के होता. 


राज्यातील प्रकल्पांची परिस्थिती...


जायकवाडी
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 21.12 टीएमसी (टक्केवारी: 27.55)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठा: 67.61 टीएमसी (टक्केवारी: 88.20)


निम्न दुधना
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 02.37 टीएमसी (टक्केवारी: 27.71)
मागील वर्षे उपयुक्त पाणी साठा: 05.92 टीएमसी (टक्केवारी: 69.25)


येलदरी
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 16.70 टीएमसी (टक्केवारी: 58.46)
मागील वर्षे उपयुक्त पाणी साठा: 18.43टीएमसी (टक्केवारी: 64.50)


सिध्देश्वर
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 06.49 टीएमसी (टक्केवारी: 17.19)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठा:  1.50टीएमसी (टक्केवारी: 52.52)


माजलगाव
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 01.78 टीएमसी (टक्केवारी: 16.15)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठा: 04.41 टीएमसी (टक्केवारी: 40.00)


मांजरा
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 01.44  टीएमसी (टक्केवारी: 22.99)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठा: 02.20  टीएमसी (टक्केवारी: 35.15)


पेनगंगा
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 18.52 टीएमसी (टक्केवारी: 54.40)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठा:  29.31टीएमसी (टक्केवारी: 86.10)


मानार
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 01.74  टीएमसी (टक्केवारी: 35.64)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठा: 04.48  टीएमसी (टक्केवारी: 100)


निम्न तेरणा
सध्याचा उपयुक्त पाणीसाठा: 0.89 टीएमसी (टक्केवारी: 27.60)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठी: 02.06  टीएमसी (टक्केवारी: 63.94)


विष्णुपूरी
सध्याचा उपयुक्त पाणीसाठी : 02.4  टीएमसी (टक्केवारी: 71.65)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठी : 0.00  टीएमसी (टक्केवारी: 75.80)
 
सिना कोळेगांव
सध्याचा उपयुक्त पाणीसाठी: -0.31 टीएमसी (टक्केवारी: -14.45)
मागील वर्षे उपयुक्त पाणीसाठी: 0.61 टीएमसी (टक्केवारी: 19.19)


पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. 


तर गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्हा हा टँकरमुक्त झाला होता. यामुळे दरवर्षी टँकरवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचला होता. मागील दमदार पावसांमुळे यावर्षी ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसल्या नाहीत. परंतु आता दमदार पावसांची हजेरी झाली नसल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जून महिन्यात पाऊस झाला, तर येणाऱ्या दिवसांत टँकरची संख्या कमी होती. परंतु यावर्षी जुलै महिना संपत आला, तरी दमदार पाऊस न झाल्याने आता टँकरची संख्या 33 वर पोहचली आहे.


विभागातील टँकरची परिस्थिती..
औरंगाबाद जिल्हा : 24 गावात 22 टँकर 
हिंगोली जिल्हा : 8 गावात 9 टँकर 
नांदेड जिल्हा : 1 गावात 2 टँकर 


दमदार पावसाची अपेक्षा कायम


जून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाळ्यात 679.5 मिमी सरासरी पावसाचे प्रमाण असून, मागील 53 दिवसांमध्ये 251.1 मिमी पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे 340 मि.मी. पाऊस या दोन महिन्यांत होणे अपेक्षित होता. त्यामुळे 90 मि.मी. पावसाची तूट आहे. यंदा राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला, त्यामुळे जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्याच्या दोन आठवड्याने राज्यात दमदार पावसाला सुरवात झाली. पण मराठवाड्यात अजूनही अशा दमदार पावसाची अपेक्षा कायम आहे. त्यामुळे या आठवड्यात अपेक्षित न पाऊस झाल्यास मराठवाड्याला पुन्हा एकदा दुष्काळी मराठवाडा म्हणण्याची वेळ येऊ शकते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Rain Update: पुढील 5 दिवस राज्यातील 'या' भागांत मुसळधार पाऊस; पाहा तुमच्या विभागातील स्थिती