औरंगाबाद : तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यात (Marathwada) मंत्रीमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) होत आहे. त्यामुळे संपूर्ण सरकार आज औरंगाबाद शहरात असणार आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळ आज औरंगाबाद (Aurangabad) शहरात असणार आहे. या मंत्रीमंडळ बैठकीतून मराठवाड्याच्या विकासात भर पाडणाऱ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. एकूण 40 हजार कोटींचं पॅकेज जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
बैठकीस मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री शहरात
2016 नंतर मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीला तब्बल 29 मंत्री येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री बैठकीला हजर असणार आहे. सोबतच त्यांचे 39 सचिव, स्वीय सहायक आणि विशेष अधिकारी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 400 शासकीय अधिकारी आणि 350 वाहनांचा ताफा असणार आहे.
मुख्यंमत्री मुक्कामी...
मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी आज मुख्यंमत्री शिंदे औरंगाबादमध्ये येणार आहे. दुपारी सुरु होणारी ही बैठक संध्याकाळी संपण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेत घेतेलेल्या निर्णयाची माहिती देतील. दरम्यान आजचा दौरा संपल्यावर मुख्यंमत्री शिंदे औरंगाबाद शहरातच मुक्काम करणार आहे. त्यानंतर उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे शासकीय ध्वजारोहण मुख्यंमत्री यांचे हस्ते होणार आहे. त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत.
40 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाला सादर
मंत्रीमंडळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा विभागातील विविध विभागाकडुन मागण्यांचे 40 हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत. यात आरोग्य, सिंचन, शेती, दळणवळण, अन्य विभागांचे प्रस्ताव आहे. ज्यात, सिंचन विभाग 21 हजार कोटी, सार्वजनिक बांधकाम 10 ते 12 हजार कोटी, ग्रामविकास 1हजार 200 कोटी, कृषी 600 कोटी, वैद्यकीय शिक्षण 500 कोटी, महिला व बालकल्याण 300 कोटी, शालेय शिक्षण 300 कोटी, क्रीडा 600 कोटी, उद्योग 200 कोटी, सांस्कृतिक कार्य 200 कोटी, नगरविकास 150 कोटीचा प्रस्ताव मुख्यंमत्री कार्यालयात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
औरंगाबाद शहरात आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री यांच्यासह 29 मंत्री शहरात असणार आहे. सोबतच वरिष्ठ अधिकारी देखील बैठकीच्या निमित्ताने शहरात आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिसांकडून मोठा बंदोबस्त येणार आहे. सोबतच इतर सहा जिल्ह्यातून देखील शहरात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. मंत्रिमंडळाची बैठक होत असलेल्या स्मार्ट सिटी कार्यालय परिसरात अक्षरशः छावणीचे स्वरूप आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: