छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे (FIR) मागे घेण्याची मागणी सतत मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांच्याकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून, याची माहिती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्याकडून देण्यात आली आहे. मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची दोन वेगवेगळ्या पद्धतीने गट केले जाणार आहे. किरकोळ गुन्हे आणि गंभीर गुन्हे अशी यादी तयार केली जात आहे. यातील किरकोळ गुन्हे तात्काळ मागे घेण्यात येणार असून, यासाठी पोलिसांकडून माहिती घेण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. 


दरम्यान पुढे बोलतांना बच्चू कडू म्हणाले की,“मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडले असून, त्यांच्या वंशावळी शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. मराठवाड्यात जुन्या नोंदी सापडताना अडचणी येत आहे. बऱ्याच ठिकाणी कागदपत्र गहाळ झाली आहे. मात्र, एका एका जिल्ह्यात 30 ते 35 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलनाचे हे यश आहे. या सर्वांची माहिती आम्ही मनोज जरांगे यांना देणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 24 लाख, जालन्यात 21 लाख, परभणी जिल्ह्यात 1 कोटी 94 लाख कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. 33-34 चे नमुने तपासले जात नव्हते. मात्र, आतापर्यंत 31 लाख 33 हजार 460 एवढे 33-34 चे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामुळे कुणबी नोंदी सापडण्याचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे गावागावात कुणबी नोंदी सापडत आहे. तर, मराठवाड्यात आतापर्यंत 31 हजार 576 नोंदी मिळाल्या असून, 12 हजार प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. 


बच्चू कडू मनोज जरांगेंची भेट घेणार...


सोमवारी मनोज जरांगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तीन ते चार तास यावर चर्चा केली. त्यानंतर आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ आणि बच्चू कडू हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर एक नवीन ड्राफ्ट तयार करण्यात आला असून, हा ड्राफ्ट बच्चू कडू यांच्याकडून जरांगे यांना दिला जाणार आहे. त्यामुळे, हा नवीन ड्राफ्ट जरांगे यांना मान्य असेल का? आणि मराठा आरक्षणावर आज तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मनोज जरांगेंसह त्यांच्या समर्थकांवर हत्येचा गुन्हा दाखल करा; गुणरत्न सदावर्तेंची याचिका, 22 जानेवारीला सुनावणी