Maratha Kranti Morcha : राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016  रोजी औरंगाबाद शहरात निघाला होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा औरंगाबाद (Aurangabad) शहरात पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चा निघाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील ज्या क्रांती चौकातून 2016 पहिला मोर्चा निघाला होता, तेथूनच पुन्हा आज मराठा क्रांती मोर्चा निघाला. मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) इतर मागण्यासाठी क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला होता. यावेळी शेकडो विध्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. 


2016 करण्यात आलेल्या एकूण 15 मागण्या पैकी सात वर्षात फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आज औरंगाबाद शहरात मोर्चा काढण्यात आला होता.  यावेळी औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाचे बापाचे, मराठा आरक्षण मिळालच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.  तर या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले. 


विध्यार्थ्यांचा मोठा सहभाग.. 


मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी आज औरंगाबादच्या क्रांती चौकात 'मराठा क्रांती मोर्चा' काढण्यात आला. क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाऊन धडकला. विशेष म्हणजे आजच्या आंदोलनात विध्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. तसेच महाविद्यालयीन तरुणींचा देखील या मोर्च्यात सहभाग होता. तसेच महिलांचं देखील लक्षणीय सहभाग पाहायला मिळाले. 


याच दिवशी निघाला होता पहिला मोर्चा...


औरंगाबाद शहरात आज 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे आजच्याच दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी राज्यातील पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला होता. विशेष म्हणजे त्यावेळी देखील हा मोर्चा क्रांती चौकातूनच निघाला होता. त्यानंतर राज्यात तब्बल 58 शहरात मोर्चे निघाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावा आणि कोपर्डी अत्याचार घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा निघाला होता. तर त्यावेळी करण्यात आलेल्या एकूण 15 मागण्यापैकी फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजात मोठा संताप असून, यासाठी वेळोवेळी आंदोलन, उपोषण आणि मोर्चे काढण्यात येत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Kranti Morcha : आजच्या दिवशी निघाला होता राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा'; असं ठरलं होतं नियोजन!