छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Ptil) यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरु केले होते. राज्य सरकारच्या शिष्टाईने एक महिन्याचा कालावधी मागितल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केले. तर दुसरीकडे जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी या उपोषणाला भेट दिली. यानंतर त्यांनी राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत 'चुन चुन के गिरायेंगे' असा इशाराच दिला. आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांच्याबाबत मोठं वक्तव्य केले आहे. 


अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. आज पत्रकरांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. 


शेंडगेंना विरोधक मानले नाही


प्रकाश शेंडगे यांच्या इशाऱ्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते टाईम आल्यावर. त्यांच्यावर मी कधीच बोलत नाही. 10 महिन्यात त्यांच्याबद्दल काही बोललो का? त्यांना मी कधी विरोधक मानले नाही. मानल्यावर बघू, ज्याला मानायचे त्याला मानले आहे. 13 तारखेपर्यंत मी त्यांच्या भूमिकेबाबत काहीच बोलणार नाही. भूमिका व्यक्त करणारे ते कोण आहेत. भूमिका व्यक्त करणारे सरकार आहे. आमचा वाद सरकारशी आहे. त्यांनी सरकारला बोलले पाहिजे आम्हाला कशाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  


मनोज जरांगेंचा बबनराव लोणीकरांना खोचक टोला 


भाजपचे नेते बबनराव लोणीकर म्हणाले की, 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री होते. पण आरक्षण दिले आहे. आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हो दिले ना. दोन अडीच करोड पोर लागली आमची नोकरीला. 13 तारखेपर्यंत थांबा, असा खोचक टोला त्यांनी लगावला. 


आरक्षण खेचून आणणार


ते पुढे म्हणाले की, कोण कोण काय बोलतंय त्याकडे समाजाचे बारकाईने लक्ष आहे. एक गोष्ट मराठा समाजाच्या एकजुटीने तयार झाली की, जो बघणारा नाही. तो आता बघायला लागला आहे. या आठ दिवसात सर्व पक्षांच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली की, ते पाठींब्यासाठी पत्र घेऊन येत आहेत. यात मराठा समाजाला चांगला संदेश जात आहे. मराठा समाज बघतोय की, कुठला लोकप्रतिनिधी येत नाही. अपेक्षा ठेवणं ही आंदोलकांची भूमिका असते. त्याला सरकारवर विश्वास ठेवावा लागतो आणि माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे . मी आरक्षण खेचून आणणार आहे, असे त्यांनी म्हटले.


आणखी वाचा 


लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस