छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केल्यानंतर भाजपाच्या वतीने फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय केलं याची पानभर दैनिकात जाहिरात देण्यात आली आहे. खास करून मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना (Jalna) आणि बीड (Beed) या तीन जिल्ह्यातील दैनिकांनाही जाहिरात देण्यात आली आहे. यात मराठा समाजाची किती पद भरली, सारथी, अण्णासाहेब विकास महामंडळाची स्थापना केली यासह अन्य योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मराठा समाजासाठी मी काय केले याचं प्रमाणपत्र कुणाकडून घेण्याची मला गरज नसल्याचे कालच फडणवीस म्हणाले होते. 


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी थेटचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. जरांगे यांच्या याच आरोपावरून भाजप नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले असल्याचं म्हटले आहे. आता यापुढे जात फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काय-काय केले याची भलीमोठी यादीच भाजपकडून जाहिरातीच्या स्वरूपात दैनिकातून देण्यात आली आहे. 


काय आहे जाहिरातीत....



  • मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या 42 आंदोलनकत्यपिको पात्र 35 वारसांना एसटीत नोकरी, या 35 कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख प्रदान.

  • वैयक्तिक कर्जव्याज परतावा योजना : एकूण लाभार्थी 

  • गट कर्ज व्याज परतावा योजना 

  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना 

  • महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा 

  • कौशल्य प्रशिक्षण 

  • डॉ. पंजाबराव देशमुख वस्ती गृह योजना 

  • कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 

  • सारथी राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजना 

  • सारथी विभागीय कार्यालये (छत्रपती शिवाजी महाराज संकुल) 

  • श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो-जर्मन टूलरूम प्रशिक्षण 

  • 9 ते 11 साठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना 

  • महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना


फडणवीसांचे उत्तर...


मनोज जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, या विषयात मला बोलायची इच्छा नव्हती. मात्र, सभागृहात विषय निघाला असल्याने बोलायला हवं. मराठा सामाजच्या संदर्भात मी काय केलं हे मराठा समाजाला माहीत आहे. मुख्यमंत्री असताना मी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं. सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिले. त्यामुळे मराठा सामाज्याच्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या नव्हे तर माझ्या पाठीशी उभे राहिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


तुम्ही लोकांच्या आया-बहिणी काढणार का? फडणवीस आक्रमक, जरांगेंच्या हिंसक वक्तव्याची SIT मार्फत चौकशी