Manoj Jarange on Devendra Fadnavis : सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण (Maratha reservation) द्या. गॅझेट सुद्धा घ्या. ते लोक तुम्हाला अंगावर घेऊन नाचतील. त्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करु नका. मी समाजाला किती जीव लावतो हे सर्वांनी पाहिले आहे. मी आरामात जगू शकत नाही. मी अंतरवालीला निघालो होतो, पोलिसांच्या शब्दावर इथे थांबलोय. पोलिसांनी मंडपाला आणि व्यासपीठाला हात लावणार असा शब्द दिलाय. अंतरवालीतील मंडपाला किंवा छत्रपतींच्या मूर्तीला हात लावला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) म्हणाले आहेत. जरांगे पाटील यांनी औरंगाबाद (Aurangabad) येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. 


मनोज जरांगे म्हणाले, गृहमंत्री तसाच वागतो, त्यामुळेच खळबळ झाली. गृहमंत्री (Devendra Fadnavis)  एसआयटी आणि मला अटक करण्याची मागणी करतोय. तुम्ही जर मला बळजबरीने आणि  षडयंत्र रचून अटक केली तर करोडो लोक उपोषणाला बसतील. कापूस जसा फुटतो तसे तुम्हाला जमीनीवर लाखो मराठे बसलेले दिसतील. त्यादिवशीही त्यांनी असेल केले. गुन्हे दाखल केले. मराठ्यांना चॅलेंज करु नका. मराठ्यांची नाराजी ओढवून घेऊ नका. तुमची संधी गेलेली नाही. समाजाला मायबाप मानलय. समाजासाठी मान कापून द्यायलाही तयार आहे. मंडप काढला जाणार नाही, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. त्यामुळे मी इथे आलो आहे. 


मनोज जरांगे यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांबाबत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मला सर्वात जास्त फोन तुमचेच आले. एसआयटी चौकशीवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत. आता म्हणाले  तर मी सलाईन उचलून चौकशीला येतो, असे जरांगे यांनी नमूद केले. जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही असं आव्हान मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटणार असल्याची चिन्हं आहेत. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange : मोठी बातमी! अंतरवालीतील मंडप हटवण्याच्या हालचाली, सलाईन काढून मनोज जरांगे तातडीने संभाजीनगरवरून रवाना